Ashes Test : गोळीच्या स्पीडने आलेला बॉल कुणालाच कळला नाही! स्टार्कने सेकंदात उडवल्या बेन स्टोक्सच्या दांड्या, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mitchell Starc bold ben stokes : ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने बेन स्टोक्सविरुद्ध अशी काही घातक बॉलिंग केली की, इंग्लंडच्या कॅप्टनला मैदानात उभं देखील राहता आलं नाही.
Australia vs England 1st Ashes Test : कसोटी क्रिकेटमधील मानाची अशी अॅशेस मालिकेला आता ऑस्ट्रेलियामध्ये सुरूवात झाली आहे. पर्थवर पहिला सामना खेळवला जातोय. टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या बेन स्टोक्सला निर्णय भारी पडला अन् ऑस्ट्रेलियाने पहिल्या 190 मिनिटातच इंग्लंडला ऑलआऊट केलंय. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्याच सत्रात 172 वर इंग्लंडचा डाव आटोपला आहे. यामध्ये कॅप्टनची विकेट खास ठरली. बेन स्टोक्सच्या विकेटची सध्या चर्चा होताना दिसतीये.
बेन स्टोक्सला काहीही समजलं नाही
मैदानावर तासनतास पाय रोवून कांगारूंना रडकुंडीला आणणाऱ्या बेन स्टोक्सची ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्ट्रार्कने विकेट काढली. हाय स्पीडने आलेला बॉल थोडाही इकडे तिकडे गेला नाही. बॉलला थोडी उसळी मिळाल्यानंतर बॉल थेट स्टंपला लागला. त्यामुळे बेन स्टोक्सला काहीही समजलं नाही. त्यामुळे त्याला फक्त 6 धावा करून मैदान सोडावं लागलं.
advertisement
पाहा Video
MITCH STARC SEEEEEEED! What a ball to dismiss Ben Stokes. #Ashes | #PlayoftheDay | @nrmainsurance pic.twitter.com/PehDst540x
— cricket.com.au (@cricketcomau) November 21, 2025
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी आहे. 2021 च्या हंगामात संघाने पाचपैकी चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर 2023 ची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे इंग्लंड अॅशेसची ट्रॉफी घरी घेऊन जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.
पर्थ कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ashes Test : गोळीच्या स्पीडने आलेला बॉल कुणालाच कळला नाही! स्टार्कने सेकंदात उडवल्या बेन स्टोक्सच्या दांड्या, पाहा Video


