AUS vs ENG Ashes Test : 0.008 सेकंद! कोण जॉन्टी रोड्स? लाबुशेनने पकडला चित्त्याहून चपळ कॅच, Video पाहून डोळे गरागरा फिरतील
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Marnus Labuschagne Catch Video : चित्ता जसं शिकारीसाठी झडप घालतो, तशीच झडप लाबुशेनने कॅच घेताना घातली. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या क्षणी जोफ्रा आर्चर 38 धावांवर आउट झाला.
AUS vs ENG 2nd Ashes Test : ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जो रूटने इंग्लंडकडून शानदार शतक झळकावत 138 धावा केल्या. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात 334 धावा केल्या आहेत. इंग्लंड सामन्यात बॅकफूटवर दिसतीये. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा झोपाळू खेळाडू मार्नस लाबुशेन याने एक असा कॅच घेतलाय की, सगळ्यांच्या झोपा उडतील.
अन् इंग्लंडच्या इनिंगचा शेवट
चित्ता जसं शिकारीसाठी झडप घालतो, तशीच झडप लाबुशेनने कॅच घेताना घातली. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या क्षणी जोफ्रा आर्चर 38 धावांवर आउट झाला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यासाठी मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) 'सुपरमॅन' कॅच घेतला. लाबुशेनने बाउंड्री लाइनजवळ 'सुपरमॅन' स्टाईलमध्ये एक शानदार कॅच पकडून आर्चर आणि इंग्लंडच्या इनिंगचा शेवट केला.
advertisement
योग्य वेळी जम्प अन् कॅच पकडला
हा अविश्वसनीय कॅच इंग्लंडच्या इनिंगच्या 77 व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. ब्रेंडन डोगेट च्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आर्चरने 'शॉर्ट आर्म पुल' मारण्याचा प्रयत्न केला. बॉलचा बॅटशी चांगला संपर्क झाला होता, मात्र बाउंड्रीवर उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेनने गजबची फुर्ती दाखवत योग्य वेळी जम्प घेऊन हा उत्कृष्ट कॅच पूर्ण केला. त्यांच्या या कॅचचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
ONE OF THE ALL-TIME SCREAMERS FROM MARNUS LABUSCHAGNE!#Ashes | #PlayoftheDay | @nrmainsurance pic.twitter.com/nF2AkvCDtZ
— cricket.com.au (@cricketcomau) December 5, 2025
जो रूटचं शानदार शतक
दरम्यान, मॅचच्या पहिल्या दिवसाचा विचार केल्यास, कर्णधार जो रूटच्या शानदार शतकामुळे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन्मानजनक स्कोर उभारण्यात यशस्वी झाला. टॉस (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती, कारण बेन डकेट (0) आणि ओली पोप (0) खाते न उघडताच पॅव्हेलियन (Pavilion) परतले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs ENG Ashes Test : 0.008 सेकंद! कोण जॉन्टी रोड्स? लाबुशेनने पकडला चित्त्याहून चपळ कॅच, Video पाहून डोळे गरागरा फिरतील


