Ayush Mhatre Record: 17व्या वर्षी मुंबईच्या आयुष म्हात्रेने क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला यशस्वीचा विक्रम

Last Updated:
News18
News18
मुंबई: भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवाल सध्या ऑस्ट्रेलियामध्ये धडाकेबाज प्रदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे भारतात त्यांचा एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला आहे. आयुष म्हात्रेने यशस्वी जायसवालचा लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 150 धावांपेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम तोडला आहे. आयुष म्हात्रेने हा नवा विक्रम मुंबई संघाकडून खेळताना केला. विशेष म्हणजे यशस्वी जायसवालने हा विक्रम मुंबईकडून खेळताना केला होता.
आयुष म्हात्रेने मंगळवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 181 धावांची खेळी केली. नागालँडविरुद्ध आयुषने 117 चेंडूंच्या 15 चौकार आणि 11 षटकार मारले. आयुष म्हात्रेच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने 403 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात नागालँडचा संघ 9 बाद 214 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईने हा सामना 189 धावांनी जिंकला. विजय हजारे ट्रॉफीमधील मुंबईचा पाच सामन्यांतील तिसरा विजय असून ते गुणतक्यात 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
advertisement
रोहित शर्माने पोस्ट केला भावूक व्हिडिओ ; ४५ मिनिटात आले 17,000 कमेंट अन्..
आयुष म्हात्रेने 17 वर्षे 168 दिवसांच्या वयात 181 धावांची खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये (50-50 ओव्हरच्या मॅच) इतक्या कमी वयात एखाद्या फलंदाजाने 150 धावांपेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी हा विक्रम यशस्वी जायसवालच्या नावावर होता. यशस्वी जायसवालने 17 वर्षे 291 दिवसांच्या वयात झारखंडविरुद्ध दुहेरी शतक झळकावले होते. त्यावेळी यशस्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्येच 154 चेंडूंत 203 धावांची खेळी केली होती. तेव्हा यशस्वीने 12 षटकार आणि 17 चौकार मारले होते.
advertisement
देशातील प्रत्येक व्यक्तीवर आहे इतक्या डॉलरचे कर्ज; स्वत: केंद्र सरकारने सांगितला
यशस्वी जायसवाल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघातील बहुतांश फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत फ्लॉप ठरले असताना यशस्वीने मात्र दमदार धावा केल्या आहेत. पर्थमध्ये शतक झळकावणाऱ्या यशस्वीने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 82 आणि दुसऱ्या डावात 84 धावा केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ayush Mhatre Record: 17व्या वर्षी मुंबईच्या आयुष म्हात्रेने क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला यशस्वीचा विक्रम
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement