ODI मध्ये न भूतो न भविष्यति, स्पिनरनी टाकल्या सगळ्या 51 ओव्हर, Super Over मध्ये वेस्ट इंडिजचा थरारक विजय!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये स्पिनरनी सगळ्या 51 ओव्हर बॉलिंग केली आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये असा विचित्र इतिहास घडला आहे.
ढाका : वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये स्पिनरनी सगळ्या 51 ओव्हर बॉलिंग केली आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये असा विचित्र इतिहास घडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने ज्या 50 ओव्हर बॉलिंग केली, त्या सगळ्या ओव्हर या स्पिनरनी टाकल्या. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतरही वेस्ट इंडिजच्या स्पिनरनेच बॉल टाकला, म्हणजेच 51 ओव्हर फक्त स्पिनरने बॉलिंग केल्याची ही पहिलीच घटना आहे.
सुपर ओव्हरचा थरार
बांगलादेशने दिलेल्या 214 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 विकेट गमावून 213 रनच करता आल्या, त्यामुळे सामना टाय झाला आणि मग सुपर ओव्हर सुरू झाली. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजने 6 बॉलमध्ये 10 रन केले, ज्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 11 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान रोखण्यासाठी वेस्ट इंडिजने अकील हुसैन या डावखुऱ्या स्पिनरला बॉलिंग दिली आणि त्याने 6 बॉलमध्ये 9 रनच दिले, त्यामुळे वेस्ट इंडिजने हा सामना 1 रनने जिंकला.
advertisement
🚨 ABSOLUTE THRILLER in Bangladesh! 🌴🔥
West Indies hold their nerves to beat Bangladesh in a heart-stopping Super Over!
The series is now 1-1, with 1 match still to go! 😱#BANvWI pic.twitter.com/gO1UM9y4Vp
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) October 21, 2025
advertisement
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 50 ओव्हरमध्ये 213/9 एवढा स्कोअर करता आला. कर्णधार शाय होपने 53 रनची खेळी केली, तर जस्टीन ग्रीव्हसने 26 आणि अलिक अथान्झने 28 रन केले. बांगलादेशकडून रिशाद हुसैनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर तनवीर इस्लाम, नसुम अहमदला 2-2 आणि सैफ हसनला 1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 213 रन केले. सौम्य सरकारने सर्वाधिक 45 रनची खेळी केली, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिशाद हुसैनने 14 बॉलमध्ये 39 रन केले, ज्यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
50 ओव्हर स्पिन बॉलिंग
advertisement
या सामन्यात वेस्ट इंडिजने सर्व 50 ओव्हर स्पिन बॉलिंगच केली. गुडाकेश मोतीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अकील हुसैन आणि अलिक अथान्झला 2-2 विकेट मिळाल्या. रोस्टन चेस आणि खेरी पेर या दोन्ही स्पिनरना एकही विकेट मिळाली नसली तरी त्यांनी फार रनही दिल्या नाहीत. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातली 3 वनडे मॅचची सीरिज 1-1 ने बरोबरीत आली आहे. आता सीरिजचा शेवटचा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ODI मध्ये न भूतो न भविष्यति, स्पिनरनी टाकल्या सगळ्या 51 ओव्हर, Super Over मध्ये वेस्ट इंडिजचा थरारक विजय!