Rakhi Sawant : आईच्या कबरीवर दारू घेऊन पोहचली राखी सावंत, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rakhi Sawant controversy : दुबईहून नुकतीच भारतात परतलेल्या राखीने, दिवाळीच्या दिवशी आपली दिवंगत आई जया यांच्या कबरीवर जाऊन सेलिब्रेशन केले. पण सोबत नेलेल्या काही वस्तूंमुळे ती आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने मात्र ही दिवाळी वादग्रस्त पद्धतीने साजरी केली आहे. दुबईहून नुकतीच भारतात परतलेल्या राखीने, दिवाळीच्या दिवशी आपली दिवंगत आई जया यांच्या कबरीवर जाऊन सेलिब्रेशन केले. पण सोबत नेलेल्या काही वस्तूंमुळे ती आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
आईच्या कबरीवर फटाके आणि दारूची बाटली
राखी सावंत नुकतीच दुबईतून परतली आहे. राखी सावंतची आई जया यांचे कर्करोग आणि ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर ती एकटी पडली होती आणि तिचे खाजगी आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेले होते. यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ती दुबईला गेली होती. दुबईहून परतल्यावर, २० ऑक्टोबर रोजी ती आईच्या कबरीवर पोहोचली. राखी आपल्यासोबत फटाके, फुलबाज्या, मिठाई आणि महत्त्वाचे म्हणजे, दारूची बाटली घेऊन गेली होती! पपाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी आईशी बोलताना दिसत आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये राखी सावंत आईच्या कबरीवर वाढलेले गवत पाहून आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. ती आईशी बोलताना म्हणते, "आई, हॅपी दिवाळी. माझ्या आईसाठी हॅपी दिवाळी. आणि हे गवत का उगवलं एवढं? तुम्ही लोक येत नाही कोणी? बघा, तीन वर्षांपासून कोणीच आलं नाही माझ्या आईच्या इथे. किती चुकीची गोष्ट आहे!"
advertisement
यावेळी तिने दारूची बाटली दाखवत "आईसाठी काय आणलंय हे बघा..." असे म्हटले. ही सगळी मिठाई आणि हे सगळे फुलं आईला आवडत होते, असे तिने सांगितले.
दारूची बाटली पाहून नेटकऱ्यांनी राखीला सुनावलं
राखीचा हा भावनिक व्हिडिओ पाहून तिचे काही चाहते हळवे झाले आणि त्यांनी तिच्या भावना समजून घेतल्या. मात्र, त्याचवेळी अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. राखी कबरीवर दारू घेऊन गेल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
advertisement
याहून मोठा मुद्दा नेटकऱ्यांनी उपस्थित केला तो म्हणजे, "तीन वर्षांत तुला आईची आठवण झाली नाही का? इतके दिवस तू का आली नाहीस?" राखीने स्वतःच्या चुकीसाठी इतरांना दोष दिल्याबद्दलही अनेकांनी तिला सुनावले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 9:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : आईच्या कबरीवर दारू घेऊन पोहचली राखी सावंत, नेटकऱ्यांनी झाप-झाप झापलं, VIDEO VIRAL