श्रीमंत बाजीराव पेशवेंची 325 वी जयंती हटक्या पद्धतीने साजरी, साकारला चाळीस फूट उंच शनिवार वाडा; पाहा Photos
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
बाजीराव पेशवे यांचा 325 व्या जयंती निम्मित इतिहास प्रेमी मित्र मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन तर्फे 40 फूट उंच आणि 7 मजली शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
पुण्यातील इतिहास प्रेमी मित्र मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 325 व्या जयंतीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुणे पुणे शहराचं वैभव असलेला चाळीस फूट उंच आणि सात मजली हुबेहूप शनिवार वाडा साकारण्यात आला आहे.याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
या शनिवार वाड्याच्या प्रकृतीत पेशवे घराण्याचा गौरव,युद्धनीती, शासन पद्धती आणि सामाजिक जीवन यांचे दर्शन घडविण्यात आले आहे. पुण्यातील इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन तर्फे मागील 25 वर्षांपासून विविध प्रकाराच्या ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.मागील वीस वर्षांपासून देश प्रेमी मित्र मंडळाकडून दुर्ग प्रतिकृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यावर्षी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त चाळीस फूट उंच आणि सात मजली शनिवार वाडा साकारण्यात आला आहे.
advertisement
देश प्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले की, 'शनिवारवाडा हा मराठा साम्राज्याचा शौर्याचा साक्षीदार आहे.मराठ्यांनी यमुना,सिंधू आणि नर्मदा नद्या ओलांडून,अटक ते कटक अटकेपार झेंडे लावले,आणि ह्या सर्व इतिहासाचा केंद्रबिंदू हा पुण्यातील शनिवार वाडा होता. म्हणून ह्यावर्षी शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारण्याचे ठरवण्यात आले'. शनिवार वाड्याची प्रतिकृती पेशवे घराण्याचा गौरव, युद्धनीती, प्रशासन पद्धती आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवण्यात आले आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत 18 ते 26 ऑक्टोबरपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून या शनिवारवाड्याच्या प्रतिकृती बनवण्यासाठी जवळपास 30 कारागिरांनी मेहनत घेतली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 21, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
श्रीमंत बाजीराव पेशवेंची 325 वी जयंती हटक्या पद्धतीने साजरी, साकारला चाळीस फूट उंच शनिवार वाडा; पाहा Photos