IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 साठी टीम इंडियाने कंबर कसली, पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्टार खेळाडूची एन्ट्री

Last Updated:

वर्ल्ड कप 2023 संपला आहे. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रे्लियानं भारताला पराभूत करत विजय ट्रॉफी आपल्या नावी केली. आता क्रिकेट चाहत्यांचा नजरा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यावर आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 सामन्यासाठी टीम इंडियानं कंबर कसली
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 सामन्यासाठी टीम इंडियानं कंबर कसली
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : वर्ल्ड कप 2023 संपला आहे. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रे्लियानं भारताला पराभूत करत विजय ट्रॉफी आपल्या नावी केली. आता क्रिकेट चाहत्यांचा नजरा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यावर आहेत. यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांमध्य कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. T20 च्या सामन्याची सुरुवात विशाखापट्टनमच्या ACA-VDCA स्टेडिअमवरुन होणार आहे. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघात आणखी एका खेळाडू एण्ट्री होणार आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळणार आहे. हा खेळाडू कोण आहे जाणून घेऊया.
विशाखापट्टणम येथील ACA-VDCA स्टेडियमवर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तरुण डावखुरा खेळाडूला ओपनिंगची संधी मिळेल. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी केवळ 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं केलेल्या शानदार फलंदाजीनं सर्वजण प्रभावित झाले आहेत. यशस्वी जैस्वालमध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार आहे.
advertisement
T20 सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध यशस्वी जैस्वालला संधी मिळणार आहे. जैस्वालनं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 167.57 च्या स्ट्राइक रेटने 248 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलंय. यशस्वी जैस्वाल वेगवान फलंदाजी करण्यात माहीर आहे. हा खेळाडू क्रीझवर येताच मोठ्या गोलंदाजांनाही घाम फुटतो.
advertisement
यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये खेळाचं एक उज्ज्वल उदाहरण सादर केलं. यशस्वी जैस्वाल भारताची पुढची स्टार सलामीवीर बनू शकते. यशस्वी जैस्वाल हा देखील डावखुरा फलंदाज आहे आणि असे फलंदाज कोणत्याही संघासाठी सर्वात मोठे एक्स फॅक्टर ठरतात. यशस्वी जैस्वालने IPL 2023 च्या 14 सामन्यांमध्ये 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या आहेत, ज्यात 82 चौकार आणि 26 षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वी जैस्वालचा आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम रन 124 धावा आहे.
advertisement
भारताचा T20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग , प्रसिद्ध कृष्णा , आवेश खान , मुकेश कुमार.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 साठी टीम इंडियाने कंबर कसली, पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्टार खेळाडूची एन्ट्री
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement