PBKS vs DC : दिल्ली जिंकली पण फायदा मुंबईचा झाला, हार्दिकला टॉप 2 मध्ये पोहोचण्याची संधी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दिल्लीच्या या विजयाने प्लेऑफच गणित बिघडलं आहे.तसेच या विजयाचा आता मुंबईला फायदा झाला आहे.मुंबईला आता टॉप 2 मध्ये पोहोचण्याची नामी संधी आहे.
PBKS vs DC :आयपीएलच्या आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने दिलेले 206 धावांचे आव्हान प्लेऑफमधून बाहेर झालेल्या दिल्ली कॅपिट्ल्सने 6 विकेट्स राखून जिंकला आहे. दिल्लीच्या या विजयाने प्लेऑफच गणित बिघडलं आहे.तसेच या विजयाचा आता मुंबईला फायदा झाला आहे.मुंबईला आता टॉप 2 मध्ये पोहोचण्याची नामी संधी आहे.
खरं तर आजचा दिल्ली कॅपिटल्स विरूद्धचा सामना जिंकून पंजाब 19 गुणांवर पोहोचली असती. या गुणांसह ती पॉईट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचली असती. पण दिल्लीने पंजाब विरूद्ध विजय मिळवून त्यांच्या स्वप्नांचा चुरांडा केला आहे. आता पंजाब पुढचा सामना 26 मे ला मुंबई विरूद्ध आहे. जर मुंबईने हा सामना जिंकला आणि बंगळुरूने लखनऊ विरूद्धचा सामना हरला तर मुंबईला टॉप 2 मध्ये जाण्याची संधी आहे.
advertisement
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (डब्ल्यू), श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमातुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (क), सेदिकुल्ला अटल, करुण नायर, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स (डब्ल्यू), आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2025 11:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PBKS vs DC : दिल्ली जिंकली पण फायदा मुंबईचा झाला, हार्दिकला टॉप 2 मध्ये पोहोचण्याची संधी