PBKS vs DC : 'सुरेश रैना 2.0' ने पंजाबचा गेम केला, दिल्लाचा शेवट गोड करणारा Sameer Rizvi कोण?

Last Updated:

दिल्लीच्या या विजयात समीर रिझ्वी अर्थात सुरैना रैना 2.0 ने मोलाची भूमिका बजावली. समीरने 58 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी करत दिल्लीचा शेवट गोड केला.दरम्यान हा समीर रिझ्वी आहे कोण? ते जाणून घेऊयात.

Sameer Rizvi
Sameer Rizvi
PBKS vs DC : आयपीएलच्या आजच्या सामन्यात मोठा उलटफेर झाला आहे.प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सने 6 विकेट्स राखून पंजाबचा पराभव केला आहे.दिल्लीने 206 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य दिल्लीने 6 विकेट्स राखून गाठलं. दिल्लीच्या या विजयात समीर रिझ्वी अर्थात सुरैना रैना 2.0 ने मोलाची भूमिका बजावली. समीरने 58 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी करत दिल्लीचा शेवट गोड केला.दरम्यान हा समीर रिझ्वी आहे कोण? ते जाणून घेऊयात.

कोण आहे समीर रिझ्वी ?

समीर रिझ्वी हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळतो.समीर रिझ्वीने घरेलू क्रिकेटमध्ये, विशेषत: उत्तर प्रदेश टी-20 लीग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. समीर हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाज आहे.त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे "सुरेश रैना 2.0" असेही संबोधले जाते.
advertisement
समीरचा जन्म मेरठ, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याचे मामा तनकीब अख्तर यांनी त्याला क्रिकेटच्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या.
advertisement
IPL 2024: समीरला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 8.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यामुळे तो त्या हंगामातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. मात्र, त्याने 8 सामन्यांत केवळ 51 धावा केल्या, ज्यामुळे CSK ने त्याला IPL 2025 साठी रिलीज केले.
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सने त्याला 95 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. त्याने या हंगामात काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे, जसे की पंजाब किंग्सविरुद्ध करुण नायरसोबत महत्त्वाची भागीदारी.
advertisement

घरेलू क्रिकेटमधील कामगिरी

उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये त्याने कानपुर सुपरस्टार्सकडून 10 सामन्यांत 455 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 35 षटकारांचा समावेश होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 7 सामन्यांत 277 धावा केल्या, ज्यामध्ये 139.90 चा स्ट्राइक रेट होता.
अंडर-23 स्टेट ए ट्रॉफीमध्ये त्याने त्रिपुराविरुद्ध 97 चेंडूत नाबाद 201 धावा आणि विदर्भाविरुद्ध 105 चेंडूत नाबाद 202 धावा केल्या, ज्यामुळे तो या स्पर्धेत दोन द्विशतके करणारा पहिला फलंदाज ठरला.त्याने अंडर-23 रेस्ट ऑफ इंडिया संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PBKS vs DC : 'सुरेश रैना 2.0' ने पंजाबचा गेम केला, दिल्लाचा शेवट गोड करणारा Sameer Rizvi कोण?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement