9 सिक्स, 114 रन... हार्दिकने टीम सोडली अन् मित्राने धमाका केला, भारतीय खेळाडूचा डेब्यूमध्येच वर्ल्ड रेकॉर्ड!

Last Updated:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्याचा विकेट कीपर बॅटर अमित पासीने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. टी-20 क्रिकेटच्या पदार्पणामध्येच अमित पासीने शतक ठोकलं आहे.

9 सिक्स, 114 रन... हार्दिकने टीम सोडली अन् मित्राने धमाका केला, भारतीय खेळाडूचा डेब्यूमध्येच वर्ल्ड रेकॉर्ड!
9 सिक्स, 114 रन... हार्दिकने टीम सोडली अन् मित्राने धमाका केला, भारतीय खेळाडूचा डेब्यूमध्येच वर्ल्ड रेकॉर्ड!
मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोद्याचा विकेट कीपर बॅटर अमित पासीने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. टी-20 क्रिकेटच्या पदार्पणामध्येच अमित पासीने शतक ठोकलं आहे. सोमवारी सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात अमित पासीने 55 बॉलमध्ये 114 रनची खेळी केली, ज्यात 9 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता.
अमित पासी टी-20 पदार्पणामध्येच शतक करणारा तिसरा भारतीय बनला आहे. 26 वर्षांच्या अमित पासीला जितेश शर्माची रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये घेण्यात आलं होतं, यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने ऐतिहासिक खेळी केली आहे. अमित पासी टी-20 पदार्पणामध्ये सर्वाधिक रन करणारा संयुक्तरित्या पहिला बॅटर बनला आहे. अमित पासीने पाकिस्तानच्या बिलाल आसिफच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सियालकोटच्या बिलालने फॉलकन्सविरुद्ध खेळताना टी-20 पदार्पणामध्ये 114 रन केले होते.
advertisement

टी-20 पदार्पणामध्ये शतक करणारे खेळाडू

114 रन- अमित पासी- बडोदा- (2015)
114 रन- बिलाल आसिफ- सियालकोट स्टॅलियन्स (2015)
112 रन- मोईन खान- कराची डॉल्फिन (2005)
108 रन- एम स्पूर्स- कॅनाडा (2022)
106 रन- एस भांबरी- चंडीग (2019)
105 रन- पीए रेड्डी- हैदराबाद (2010)
104 रन- एलए डुनबा- सर्बिया (2019)
102 रन- अब्दुल्लाह शाफिक- सेंट्रल पंजाब (2020)
advertisement
101 रन- रविंद्र पाल सिंह- कॅनाडा (2019)
100 रन- आसिफ अली- फैसलाबाद वोल्व्स (2011)

पहिल्याच सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच

अमित पासीच्या शतकामुळे बडोद्याने 20 ओव्हरमध्ये 220 रनचा मोठा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सर्व्हिसेसनेही जोरदार पलटवार केला. कुवार पाठक आणि रवी चौहान यांनी 51-51 रन केले, पण सर्व्हिसेसचा 13 रननी पराभव झाला. पहिल्याच सामन्यात शतक करणाऱ्या अमित पासीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या विजयासोबतच बडोदा ग्रुप सी च्या पॉईंट्स टेबलमध्ये 16 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बडोद्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे सर्व्हिसेसचा हा 7 सामन्यांमधला सहावा पराभव होता. सर्व्हिसेस पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात खाली 8व्या क्रमांकावर आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
9 सिक्स, 114 रन... हार्दिकने टीम सोडली अन् मित्राने धमाका केला, भारतीय खेळाडूचा डेब्यूमध्येच वर्ल्ड रेकॉर्ड!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement