IPL 2025 : मॅच संपली पण बाप ऑन ड्युटीच होता,हार्दिकने मैदानात वडिलाच कर्तव्य बजावलं, पाहा VIDEO

Last Updated:

सामन्यानंतर मुंबईने भन्नाट जल्लोष केला होता. या जल्लोषा दरम्यान हार्दिक पंड्यामध्ये बापमाणसाची झलक दिसली. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

hardik pandya son agastya
hardik pandya son agastya
Hardik Pandya Video : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज,रॉयल चँलेंजर्स बंगळूरू आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. मुंबईने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत हे चौथे स्थान गाठले होते. दरम्यान या सामन्यानंतर मुंबईने भन्नाट जल्लोष केला होता. या जल्लोषा दरम्यान हार्दिक पंड्यामध्ये बापमाणसाची झलक दिसली. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
खरं तर वानखेडेच्या मैदानावरील विजयानंतर मुंबईने तुफान जल्लोष केला.वानखेडेच्या मैदानावर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबईच्या संघाने मैदानावर एक फेरी मारुन मुंबईच्या चाहत्यांचे आभार मानले होते. यावेळी हार्दिक पंड्याचं लक्ष्य स्टेडिअममध्ये बसलेल्या आपल्या मुलाकडे गेले. त्याने यावेळी आपल्या मुलाकडे पाहून जल्लोष देखील केला. तसेच मुलाला फ्लँकीस देखील दिली.














View this post on Instagram
























A post shared by @hitman_is_emotion



advertisement
त्यानंतर हार्दिक पंड्याने हातवारे करत तू घरी जा असे आपल्या लेकाला देखील सांगितले.तसेच तू त्यांच्यासोबत घरी जा आणि झोपी जा,असे देखील तो सांगताना दिसला.त्यामुळे मैदानात हार्दिक पंड्यामध्ये बापमाणूस दिसला. एकीकडे मुंबई संघासाठी आपले नेतृत्व बजावत असताना दुसरीकडे हार्दिकने आपल्या वडीलाच कर्तव्य देखील बजावलं.

टॉप 2 ची शर्यत अवघड

advertisement
दरम्यान आता मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईला जर आता फायनल गाठायची असेल तर त्यांना काही करून टॉप 2 मध्ये येणे आवश्यक आहे.मुंबईचे सध्या 16 गुण आहेत. मुंबई जर त्यांचा पुढचा सामना दिल्लीविरूद्ध जिंकली तर त्यांचे गुण 18 होणार आहे. पण या गुणांच्या बळावर त्यांना टॉप 2 मध्ये पोहोचता येणार नाही आहे.
advertisement
कारण बंगळुरू आणि पंजाबचे दोन सामने उरले आहेत आणि दोघांचे गुण 17 आहेत. दोघांनी एक जरी सामना जिंकला तरी त्यांचे गुण 19 होणार आहे.गुजरातचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे गुजरात हा सामना जिंकून 20 धावांपर्यंत पोहोचू शकतो.त्यामुळे मुंबई टॉप 2 मध्ये पोहोचणे अवघड आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : मॅच संपली पण बाप ऑन ड्युटीच होता,हार्दिकने मैदानात वडिलाच कर्तव्य बजावलं, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement