IND vs SA : चुकीला माफी नाही! हर्षित राणावर ICC ची मोठी कारवाई, 22 व्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
ICC Action On Harshit Rana : पहिल्या वनडे सामन्यातील विजयानंतर हर्षित राणाला आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताकीद मिळाली आहे.
Harshit Rana sanctioned By ICC : विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 रन्सने सामना जिंकला. या सिरीजमधील दुसरा मॅच आज रायपूर येथे होणार आहे. अशातच आता आयसीसीने टीम इंडियाचा बॉलर हर्षित राणा याच्यावर कारवाई केली आहे. भारताच्या युवा बॉलर हर्षित राणाने नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामनात केलेल्या एका कृतीमुळे त्याला आयसीसीच्या (ICC) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन
रांची येथे झालेल्या पहिल्या सामनात भारताने विजय मिळवला असला तरी, या विजयानंतर हर्षित राणाला आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताकीद मिळाली आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी पाळावयाच्या शिस्तीचे महत्त्वाची असल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. पण मॅचमध्ये काय झालं होतं? पाहा
ब्रेविस आऊट झाला अन्...
advertisement
हा प्रसंग दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 22 व्या ओव्हरमध्ये घडला. जेव्हा भारतीय पॅसर हर्षित राणा याने साऊथ अफ्रिकन फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याला आऊट केलं. ब्रेविस आऊट झाल्यानंतर, हर्षित राणाने त्याला ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्याचा हावभाव केला. आयसीसीने (ICC) हर्षितचे हे कृत्य खेळाडू आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन मानले आहे.
advertisement
दंडात्मक कारवाई नाही पण...
कलम 2.5 हे 'फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याला चिथावणी देणारी किंवा अपमानजनक भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी' संबंधित आहे. हर्षित राणाची ही कृती फलंदाजाकडून आक्रमक प्रतिसाद मिळवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असं मानलं गेलं आहे. त्यामुळे हर्षितवर ताकीद म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली नसून, त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक 'डेमेरिट पॉइंट' जोडला गेला आहे.
advertisement
फक्त ताकीद मिळाली
दरम्यान, मागील 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने, त्याला फक्त ताकीद मिळाली आहे. हर्षितने आपला गुन्हा मान्य केला असून, मॅच रेफ्री रिची रिचर्डसन (Richie Richardson) यांनी प्रस्तावित केलेली शिक्षा स्वीकारली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 12:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : चुकीला माफी नाही! हर्षित राणावर ICC ची मोठी कारवाई, 22 व्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं?


