48 Run Over: 6 चेंडूत 48 धावा...क्रिकेट इतिहासातील सर्वात विक्रम ओव्हर, वर्ल्ड रिकॉर्ड आज देखील कायम
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
History of Cricket: एका षटकात जास्तीत जास्त किती धावा होऊ शकतात? तुम्ही म्हणाल 6 कायदेशीर चेंडूंवर जास्तीत जास्त 36 धावा. पण दोन वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये एका षटकात तब्बल 48 धावा झाल्या होत्या, ज्यात 7 षटकारांचा समावेश होता. हा विश्वविक्रम अफगाणिस्तानचा 21 वर्षांचा खेळाडू सेदिकुल्लाह अतल यांनी केला होता आणि तो आजही कायम आहे.
नवी दिल्ली : क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात विक्रम बनतात ते मोडण्यासाठीच. अफगाणिस्तानच्या युवा फलंदाज सेदिकुल्लाह अटल यांनी दोन वर्षांपूर्वी असा एक विश्वविक्रम रचला होता, जो आजतागायत अबाधित आहे. या विक्रमामध्ये एका षटकात तब्बल सात षटकार ठोकण्याचा आणि एकूण 48 धावा करण्याचा समावेश आहे.
सेदिकुल्लाहने जेव्हा एका षटकात सात षटकार ठोकून क्रिकेट विश्वात खळबळ माजवली. तेव्हा त्याचे वय फक्त 21 वर्षे होते. त्यांनी संघ संकटात असताना जबरदस्त फटकेबाजी करत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. हे कारनामा त्यांनी शाहीन हंटर्स संघासाठी केला होता. काबूल प्रीमियर लीगमधील अबासिन डिफेंडर्स विरुद्ध खेळताना त्यांनी हा अद्भुत विक्रम नोंदवला. जो आजही कोणत्याही एका षटकात फलंदाजाकडून केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मानला जातो.
advertisement
19व्या षटकात अटल यांनी डावखुऱ्या फिरकीपटू आमिर जजई यांच्यावर 48 धावा ठोकल्या. त्या वेळी शाहीन हंटर्सचा स्कोअर 6 बाद 158 असा होता आणि कर्णधार सेदिकुल्लाह अटल 43 चेंडूत 71 धावांवर खेळत होते. आमिर जजई यांनी त्याआधी तीन षटकांत 31 धावा देऊन एक बळी घेतला होता.
advertisement
19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, जो ‘नो बॉल’ ठरला, अटलने षटकार ठोकला. त्यानंतर जजईने सलग पाच वाईड चेंडू टाकले. फ्री हिटचा फायदा घेत अटलने आणखी एक षटकार मारला. पण त्यांचा हल्ला इथे थांबला नाही. त्यांनी पुढील पाचही चेंडूंवर षटकार ठोकले आणि आपल्या संघाचा स्कोअर 200 च्या पुढे नेला. या दरम्यान त्यांनी फक्त ४८ चेंडूत शतक पूर्ण केले.
advertisement
आमिर जजईने लुटले तब्बल 79 धावा
या भयानक षटकानंतर जजईच्या आकडेवारीत 4 षटके 79 धावा आणि 1 बळी असा आकडा होता. नवीद जादरानने अखेरच्या षटकात फक्त ७ धावा दिल्या, त्यामुळे शाहीन हंटर्सने 6 बाद 213 धावांचा डोंगर उभा केला.
advertisement
सेदिकुल्लाह अटलने 56 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 118 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात, अबासिन डिफेंडर्सची टीम 18.3 षटकांत केवळ 121 धावांत गारद झाली आणि शाहीन हंटर्सने 92 धावांनी विजय मिळवला.
सेदिकुल्लाह अटलचा क्रिकेट करिअर
advertisement
सेदिकुल्लाह अटलने आतापर्यंत 1 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांच्या नावावर फक्त 3 धावा आहेत, तर एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 335 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यांच्या नावावर 402 धावा आणि 3 अर्धशतके आहेत.
advertisement
काबूलच्या दक्षिणेकडील लोगर प्रांतातील हा डावखुरा सलामी फलंदाज 2023 आणि 2024 मध्ये अफगाणिस्तानसाठी तिन्ही स्वरूपात (टेस्ट, वनडे, टी-20) पदार्पण केले. त्यांनी आपला पहिला टी-20 सामना सप्टेंबर 2020 मध्ये 19 वर्षांच्या वयात शपागीजा प्रीमियर लीगमध्ये काबूल ईगल्स संघाकडून खेळला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
48 Run Over: 6 चेंडूत 48 धावा...क्रिकेट इतिहासातील सर्वात विक्रम ओव्हर, वर्ल्ड रिकॉर्ड आज देखील कायम