Mumbai Indians: 5 पैकी 4 मॅच गमावल्यानंतर Playing XIवरून मुंबईच्या कोचचे मोठे वक्तव्य, ही गोष्ट धोकादायक ठरले

Last Updated:

IPL 2025 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने IPL 2025 मध्ये आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. संघाची कामगिरी सुमार असूनही मुख्य कोच माहेला जयवर्धने यांनी अंतिम 11 मध्ये मोठे बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांच्यावरच भरवसा ठेवू.

News18
News18
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या लढतीत पराभव झाला. मुंबईने आतापर्यंत पाचपैकी चार सामने गमावले आहेत.स्पर्धा निम्म्यावर आली असताना मुंबई संघा अद्याप फॉर्ममध्ये दिसत नाही. अशात आता पुढील सामन्यात संघात मोठे बदल होते का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स संघात खरच बदल होणार का? याबद्दल आता संघातील महत्त्वाच्या व्यक्तीने अपडेट दिले आहेत.
मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी यावर प्रतिक्रिया देताना संघात मोठे बदल करण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम ठेवत त्यांना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित केले जाईल.
सोमवारी मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जयवर्धने यांना पुढील सामन्यांमध्ये प्लेइग इलेव्हनमध्ये बदल करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर दिलं, खरं तर नाही. निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत. पण तरीही आम्ही काही चांगली क्रिकेट खेळलो आहोत.
advertisement
पाठिंबा देणार 
जयवर्धने म्हणाले, मी अजूनही सीनियर खेळाडूंना संघात ठेवण्याच्या बाजूने आहे. जे खेळाडू आमच्या विश्वासावर उतरले आहेत. त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. पण आता थोडं अधिक जबाबदार व्हावे लागेल.
 लगेच संधी देणं धोकादायक  
संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मात्र तरीही जयवर्धने यांनी संघात नवख्या चेहऱ्यांना घेणं हाच उपाय नाही, असं सांगितलं. पराभूत होणे हे कधीच चांगलं नसतं. त्यातून आत्मविश्वास ढासळतो. अशा अवस्थेत अनुभव नसलेल्या खेळाडूंना संघात घेणं त्यांच्या दृष्टीने अधिक कठीण ठरू शकतं.
advertisement
अनुभवच सावरतो
जे खेळाडू अनुभवी आहेत, त्यांना अशा परिस्थिती हाताळण्याची सवय आहे. ते मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असतात आणि यावरच आमचा भर राहणार आहे, असंही जयवर्धने यांनी ठामपणे सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians: 5 पैकी 4 मॅच गमावल्यानंतर Playing XIवरून मुंबईच्या कोचचे मोठे वक्तव्य, ही गोष्ट धोकादायक ठरले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement