IND A vs AUS A : विराट कोहलीला भिडणाऱ्या युवा खेळाडूचं भारतात शतक, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डोकेदुखी वाढवणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा सलामीवीराने खणखणीत शतक ठोकलं आहे. 126 बॉलमध्ये त्याने 101 धावा करून तो नाबाद आहे.हा तोच खेळाडू आहे,जो बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान विराट कोहलीशी राडा झाला होता.
India A vs Australia A : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील अनधिकृत टेस्ट सामन्याला आजपासून सूरूवात झाली आहे.या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा सलामीवीराने खणखणीत शतक ठोकलं आहे. 126 बॉलमध्ये त्याने 101 धावा करून तो नाबाद आहे.हा तोच खेळाडू आहे,जो बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान विराट कोहलीशी राडा झाला होता. आता याच खेळाडूने भारतात येऊन धमाकेदार शतक ठोकलं आहे.त्याच्या या शतकाची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास आहे. सॅम कोन्स्टासने भारत अ विरूद्ध शतकं ठोकलं आहे.सॅम कोन्स्टासने 126 बॉलमध्ये 101 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे.या खेळीत त्याने 3 गगनचुंबी षटकार आणि 10 खणखणीत चौकार लगावले आहेत.
सॅम कोन्स्टास सोबत कॅम्पबेल केलावेने देखील 88 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. त्याने या खेळीत 2 षटकार आणि 10 चौकार लगावले आहेत. दरम्यान कॅम्पबेलच्या विकेटनंतर लगेचच नथन मॅकस्विनीने 1 धावांवर बाद झाला आहे.अशाप्रकारे आस्ट्रेलिया अ संघाच्या 205 धावांवर 2 विकेट पडल्या आहेत.टीम इंडिया अ कडून गुरनुर ब्रार आणि हर्ष दुबेने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.
advertisement
मेलबर्न टेस्टमध्ये कोहली-कोन्स्टान्समध्ये राडा
बॉर्डर गावस्कर मालिकेतील मेलबर्न टेस्ट सामन्यात विराट कोहली आणि सॅम कोन्सटास यांच्यात तुफान राडा झाला होता.खरं तर भारताच्या 10 व्या ओव्हर दरम्यान हा सगळा राडा खडला आहे.कदाचित सॅम कोन्सटास क्रिझ क्रॉस करत होता. त्याच्या समोरून विराट कोहली जात होता.यावेळेस विराटचा खांदा अचानक थेट सॅम कोन्सटास धडकला.त्यानंतर सॅम कोन्सटास भडकला आणि त्याने विराटच्या दिशेने पाहून काहीतरी पुटपुटायला सूरूवात केली. यावेळी विराट देखील त्याला काहीतरी बोलला. दोघांमधीली शाब्दीक वाद वाढताना पाहून उस्मान ख्वाजा आणि अंपायरने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला होता.
advertisement
या राड्यानंतर ऑस्ट्रेलिया चांगलीच भडकली आहे. मैदानातील या राड्याला विराट कोहली जबाबदार असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगने केला आहे.त्यानंतर विराट कोहलीवर कारवाई देखील करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलिया अ (प्लेइंग इलेव्हन): सॅम कोन्स्टास, कॅम्पबेल केलावे, नॅथन मॅकस्वीनी (कर्णधार) ऑलिव्हर पीक, जोश फिलिप (विकेटकिपर), कूपर कोनोली, लियाम स्कॉट, झेवियर बार्टलेट, फर्गस ओ नील, कोरी रोचिचिओली, टॉड मर्फी
advertisement
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन,साई सुदर्शन, एन जगदीसन, श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), तनुष कोटियन, हर्ष दुबे, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, गुरनूर ब्रार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 3:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND A vs AUS A : विराट कोहलीला भिडणाऱ्या युवा खेळाडूचं भारतात शतक, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डोकेदुखी वाढवणार