पोलीस स्टेशनमध्ये राडा, भाजपचा माजी आमदार गायकवाडला दिलासा, निर्दोष सुटका; प्रकरण काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये राडा घातल्या प्रकरणी भाजप माजी आमदार गणपत गायकवाडची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
कल्याण : उल्हासनगरच्या गोळीबार घटनेनंतर चर्चेत आलेला भाजपचा माजी आमदार गणपत गायकवाडची कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणी सुटका करण्यात आली आहे. गायकवाडसह शिवसेना माजी नगरसेवक निलेश शिंदेसह तीन अन्य जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये राडा घातल्या प्रकरणी भाजप माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहो. कल्याण न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती . विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः हा गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र आज पुराव्या अभावी कल्याण न्यायालयाने गणपत गायकवाडसह इतर चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
advertisement
गणपत गायकवाड हा आजही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात आहे. मात्र याआधी 2014 चा या गुन्ह्यात "वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन केल्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे...
कोणत्या प्रकरणामुळे गणपत गायकवाड चर्चेत?
advertisement
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती न झाल्याने गणपत गायकवाडच्या विरोधात महेश गायकवाड प्रमुख दावेदार होते. दोघांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू होतं. उल्हासनगरमधील द्वारली गावातील जमिनीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्या जागेवर बांधलेली भिंत महेश गायकवाड यांनी पाडली होती. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. तिथे वाद विकोपाला गेला आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच गोळीबार केला.
advertisement
कोण आहे गणपत गायकवाड?
गणपत गायकवाड एकेकाळी रिक्षा चालवायचा, नंतर तो केबल व्यवसायात उतरला. लोकांना फुकट केबल दिली अन् कल्याणमध्ये गणपत गायकवाड लोकप्रिय झाला. फुकटात केबल दिल्यानं लोकांनी मत दिली अन् 2009 मध्ये गणपत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाला. 2009, 2014, 2019 साली कल्याण पूर्व मतदारसंघाचा आमदार होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलीस स्टेशनमध्ये राडा, भाजपचा माजी आमदार गायकवाडला दिलासा, निर्दोष सुटका; प्रकरण काय?