IND vs AUS T20 : सूर्या टॉसला गेला अन् इतकं बीसीसीआयने दिली वाईट बातमी! श्रेयसनंतर स्टार ऑलराऊंडर टीममधून बाहेर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nitish kumar Reddy Injury : भारताचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
Australia vs India 1st T20I : सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्घ टीम इंडियाचा बॅटर श्रेयस अय्यर याला एक भन्नाट कॅच घेताना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच श्रेयसला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता तो आयसीयूमधून बाहेर आला असून येत्या काही दिवसात त्याच्यावर डॉक्टरांची नजर असणार आहे. अशातच आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
नितीश रेड्डी पहिल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यातून बाहेर
भारताचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. नितीश कुमार रेड्डी याला अॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरत असताना नितीशला आणखी एका दुखापतीने ग्रासल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
Update
Nitish Kumar Reddy has been ruled out for the first three T20Is. The all-rounder who was recovering from his left quadriceps injury sustained during the second ODI in Adelaide, complained of neck spasms, which has impacted his recovery and mobility. The BCCI Medical… pic.twitter.com/ecAt852hO6
— BCCI (@BCCI) October 29, 2025
advertisement
बीसीसीआयची वैद्यकीय टीम अॅक्शन मोडवर
सूर्यकुमार यादव पहिल्या टी-ट्वेंटीच्या टॉससाठी मैदानात आला अन् बीसीसीआयने ट्विट करत नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीवर भाष्य केलं. टी-ट्वेंटी मालिकेच्या सुरूवातीलाच नितीश कुमार रेड्डी याने मानेच्या दुखापतीची तक्रार केली आहे. ज्यामुळे नितीशच्या कमबॅकवर आणि हालचालीवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
advertisement
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS T20 : सूर्या टॉसला गेला अन् इतकं बीसीसीआयने दिली वाईट बातमी! श्रेयसनंतर स्टार ऑलराऊंडर टीममधून बाहेर!


