Rohit Sharma : गिलचं बोलणं जिव्हारी लागलं, हिटमॅनने 48 तासात नव्या कॅप्टनला उत्तर दिलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. रोहित शर्माचं नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना अगदी सहज खिशात टाकला.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. रोहित शर्माचं नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना अगदी सहज खिशात टाकला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 237 रनचं आव्हान भारताने 38.3 ओव्हरमध्येच पार केलं. रोहित शर्माने 125 बॉलमध्ये नाबाद 121 रन केले, तर विराट कोहलीने नाबाद 74 रनची खेळी केली. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे 33वं शतक होतं.
या कामगिरीबद्दल रोहित शर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, याशिवाय रोहित प्लेअर ऑफ द सीरिजही ठरला. याआधी दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने 73 रनची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच टीम इंडियाने गमावल्या होत्या, त्यामुळे व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्याचं आव्हान टीम इंडियापुढे होतं. रोहित आणि विराटच्या मॅच विनिंग खेळीमुळे टीम इंडियाची लाज वाचली.
advertisement
कॅप्टन गिलला रोहितचं उत्तर
दुसऱ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर गिलने रोहितला मोठा स्कोअर करता आला नाही, असं वक्तव्य केलं होतं. 'बऱ्याच काळानंतर रोहितने पुनरागमन केलं आहे. सुरूवातीच्या काही ओव्हरमध्ये त्याने जी लढत दिली, ती पाहून आनंदी आहे, पण त्याने मोठी इनिंग खेळण्याची संधी आज गमावली', असं गिल म्हणाला होता. गिलच्या या वक्तव्यानंतर 48 तासांमध्येच रोहितने फक्त मोठी खेळीच नाही, तर नाबाद शतक करून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
रोहित झाला भावुक
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियामधली ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती, कारण पुढच्या 2 वर्षात भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार नाही. सिडनीमध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर रोहित शर्माने इमोशनल प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा खेळण्यासाठी येऊ का नाही, माहिती नाही, पण ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना प्रत्येक क्षण एन्जॉय केला. ऑस्ट्रेलियातल्या प्रेक्षकांचे आभार, असं रोहित शर्मा म्हणाला.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी निवड समिती आणि बीसीसीआयने रोहितची वनडे टीमची कॅप्टन्सी काढून गिलकडे नेतृत्व देण्यात आलं. तेव्हापासून रोहित आणि विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती, पण रोहित शर्माने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : गिलचं बोलणं जिव्हारी लागलं, हिटमॅनने 48 तासात नव्या कॅप्टनला उत्तर दिलं!


