Virat Kohli : पहिली रन काढताच विराटला आठवला 'आगरकर', सिडनीच्या मैदानात मोठा ड्रामा, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीने अखेर त्याची पहिली रन काढली आहे. विराटच्या पहिल्या रननंतर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीने अखेर त्याची पहिली रन काढली आहे. विराटच्या पहिल्या रननंतर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. हा जल्लोष पाहून विराट कोहलीच्या चेहऱ्यावरही हसू आलं. शुभमन गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहली बॅटिंगला आला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 237 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गिल आणि रोहित यांच्यात 69 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधील पहिली वनडे पर्थमध्ये खेळवली गेली होती, तेव्हा कोहलीने 224 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. बऱ्याच काळानंतर कमबॅक करणाऱ्या विराटकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या, पण तो डकवर आऊट झाला, यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही विराटला त्याचं खातं उघडता आलं नाही. लागोपाठ दोन सामन्यांमध्ये शून्यवर आऊट होण्याची विराटची ही पहिलीच वेळ होती.
दोन डकनंतर पहिली रन
advertisement
लागोपाठ दोन सामन्यात शून्य रनवर आऊट झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विराट काय करणार? याबाबत चाहत्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. पण पहिल्याच बॉलला विराटने जलद एक रन धावली, यानंतर सिडनीमधल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. कोहलीनेही पहिली रन काढल्यानंतर हटके अंदाजात सेलिब्रेशन केलं, यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हास्यही होतं.
Eppudu ela chestharu ra duck out #INDvsAUS #ViratKohli
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : पहिली रन काढताच विराटला आठवला 'आगरकर', सिडनीच्या मैदानात मोठा ड्रामा, Video


