IND vs AUS: गिल कॅप्टन, 2 EX कॅप्टन; रोहित-विराटचं कमबॅक; अशी असणार इंडियाची Playing 11, नव्या कर्णधाराची अग्निपरीक्षा

Last Updated:

IND vs AUS First ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पर्थमध्ये रंगणार असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिक बळकट झाला आहे. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक नवे चेहरे आणि रणनीती पाहायला मिळणार आहेत.

News18
News18
पर्थ: उद्या रविवार 19 ऑक्टोबरपासून भारतऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. पर्थमध्ये पहिली वनडे होणार असून सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या स्टार जोडीवर म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर केंद्रीत आहे. या दोघांनी 9 मार्च 2025 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच त्यांनी जून महिन्यात संपलेल्या आयपीएलनंतर कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेलं नाही.
advertisement
या मालिकेत दोघेही परतल्याने भारतीय संघाची ताकद दुप्पट होणार आहे. हे दोन स्टार संघात परतल्याने आता प्लेइंग 11 मधून कोणाला डच्चू मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे.
भारताचा संभाव्य फलंदाजी क्रम
भारतीय फलंदाजी क्रम जवळपास निश्चित दिसत आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल हे ओपनिंग करतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, तर के.एल. राहुल विकेटकीपरफलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावर उतरेल.
advertisement
नितीश कुमार रेड्डी या मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. तो सहाव्या किंवा सातव्या स्थानावर खेळू शकतो. त्याच्यासोबत अक्षर पटेल असेल, जो संघाला बॅलन्स देऊ शकतो. जसप्रीत बुमराह या मालिकेत विश्रांतीवर असल्यामुळे, भारत गोलंदाजीमध्ये विकेट घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल का? की कोच गौतम गंभीर हे वॉशिंग्टन सुंदरला पसंती देतील? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा हा पहिला आंतरराष्ट्रीय वनडे असून रोहित आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यांनी सांगितलं की, ते पूर्णपणे वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार नाही. याचा अर्थ असा की मॅट कुन्हेमन, डावखुरा फिरकीपटू, आपल्या स्वतःच्या भूमीवर पहिला वनडे सामना खेळणार आहे.
advertisement
दरम्यान प्रमुख फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पा आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे या सामन्यातून बाहेर आहे. त्यामुळे मॅट रेनशॉ आणि मिच ओवेन या दोघांना आपला वनडे पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
संभाव्य प्लेइंग 11
advertisement
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
advertisement
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ:
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅट शॉर्ट, मॅट रेनशॉ, जोश फिलिप (विकेटकीपर), मिच ओवेन, कूपर कॉनॉली, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅट कुन्हेमन, जोश हेजलवूड
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS: गिल कॅप्टन, 2 EX कॅप्टन; रोहित-विराटचं कमबॅक; अशी असणार इंडियाची Playing 11, नव्या कर्णधाराची अग्निपरीक्षा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement