ऐन दिवाळीत रोहित-विराट फटाके फोडणार, IND vs AUS मॅच Live कुठे पाहता येणार? किती वाजता सुरू होणार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वेस्ट इंडिजचा टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केल्यानंतर भारतीय टीम आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच होणार आहे.
मुंबई : वेस्ट इंडिजचा टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केल्यानंतर भारतीय टीम आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच होणार आहे. 19 ऑक्टोबरपासून वनडे सीरिजला सुरूवात होईल. टीम इंडियाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली 7 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहेत. वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. निवड समिती आणि बीसीसीआयने 2027 चा वर्ल्ड कपची तयारी म्हणून रोहितची कॅप्टन्सी काढून गिलला जबाबदारी दिली आहे. 15 ऑक्टोबरला सकाळी टीम इंडिया दिल्लीहून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.
मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळणार आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कामगिरी कशी होते? यावर ते 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का नाही, याचं उत्तर मिळणार आहे. 3 वनडे मॅचची सीरिज संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळेल. टी-20 सीरिजचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे.
advertisement
किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीनही वनडे भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत. मॅचचा टॉस सकाळी 8.30 वाजता होईल. पर्थ, ऍडलेड आणि सिडनीमध्ये तीन वनडे खेळवल्या जातील. वनडे सीरिजनंतर 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. या पाचही टी-20 भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सुरू होतील.
कुठे पाहता येणार मॅच?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच या जिओ हॉटस्टारच्या ऍप आणि वेबसाईटवर पाहता येतील, याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही मॅच दिसतील.
advertisement
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरी वनडे- 23 ऑक्टोबर, ऍडलेड
तिसरी वनडे- 25 ऑक्टोबर, सिडनी
टी-20 सीरिजचं टाईमटेबल
पहिली टी-20- 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरी टी-20- 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरी टी-20- 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथी टी-20- 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवी टी-20- 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
advertisement
भारताची टी-20 टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऐन दिवाळीत रोहित-विराट फटाके फोडणार, IND vs AUS मॅच Live कुठे पाहता येणार? किती वाजता सुरू होणार