Share Market मध्ये गोल्डन टाइम सुरू, 10 शेअर्सवर ‘परफेक्ट एंट्री पॉइंट’ तयार; पुढील 6 महिन्यात तुमचं रिटर्न डबल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Multibagger stocks: गुंतवणूकदारांसाठी बाजारात पुन्हा सोन्याची संधी निर्माण झाली आहे. सुशील केडिया यांच्या मते, करेक्शनची वेळ ही घसरण नसून खरी कमाईची संधी आहे. योग्य स्टॉक्स निवडून संयमाने गुंतवणूक केली, तर 2025 गुंतवणूकदारांसाठी सुवर्णवर्ष ठरू शकते.
मुंबई: शेअर बाजारातील प्रसिद्ध विश्लेषक आणि Kedianomics चे संस्थापक सुशील केडिया यांनी बाजाराच्या आगामी दिशेबाबत मोठे भाकीत केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या बाजारात खरेदीच्या सौद्यांमधूनच मोठा नफा मिळेल. मात्र अधूनमधून बाजारात करेक्शन (गिरावट) येत राहील. गुंतवणूकदारांनी योग्य वेळी चांगल्या कंपन्यांमध्ये पोझिशन घ्यावी आणि संयमाने बसावे, असा त्यांचा सल्ला आहे.
advertisement
सनोफी, बीएसई आणि जिओ फायनान्सकडून मोठ्या वाढीची अपेक्षा
सुशील केडिया यांनी आपल्या आवडत्या शेअर्सविषयी बोलताना सांगितले की- सनोफी (Sanofi) या कंपनीच्या शेअरमध्ये मोठा ब्रेकआउट येणार आहे आणि हा शेअर एका वर्षात दुप्पट होऊ शकतो. अल्पकालीन ट्रेडिंगच्या दृष्टीने त्यांना बीएसई लिमिटेड (BSE) हा शेअर आकर्षक वाटत आहे. त्यांच्या मते डिसेंबरपर्यंत बीएसईचा शेअर 4200 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
advertisement
तसेच जिओ फायनान्स (Jio Finance) मध्येही पुढील 3 ते 4 महिन्यांत 35 टक्क्यांपर्यंत वाढ दिसू शकते. दीर्घकालीन (1 वर्षाहून अधिक) दृष्टीने पाहिल्यास ट्रेंट (Trent) या कंपनीचा शेअर तीनपटपर्यंत वाढण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले.
advertisement
चांदीने मोडले सर्व विक्रम, गुंतवणूकदार चकित; भाव होणार तब्बल 2.18 लाख
बजाज ऑटो आणि टाटा मोटर्सवर विश्वास
दोन चाकी वाहन क्षेत्रात (Two-Wheeler Segment) सुशील केडिया यांना बजाज ऑटो (Bajaj Auto) हा शेअर अत्यंत मजबूत वाटतो. त्यांनी सांगितले की, पुढील 3 महिन्यांत बजाज ऑटो उत्तम प्रदर्शन करेल आणि एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर दुप्पट भावाने ट्रेड होऊ शकतो. अल्पकालात (1 ते 1.5 महिने) या शेअरचा दर 12,000 पर्यंत जाऊ शकतो, असा त्यांचा अंदाज आहे.
advertisement
चार चाकी क्षेत्रात (Four-Wheeler Segment) त्यांनी टाटा मोटर्स (Tata Motors) वर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. सुशील केडिया म्हणाले, 600 चा टाटा मोटर्सचा शेअर भविष्यात 1200 रुपयांपर्यंत जाईल. तो ट्रेडिंगसाठी नाही, तर डिलिव्हरी घेऊन ठेवण्यासाठी योग्य स्टॉक आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मारुती सुजुकी (Maruti Suzuki) मध्ये सध्या गुंतवणूक टाळावी.
advertisement
सोन्याच्या किंमतीत झालेल्या तेजीबाबत सुशील केडिया यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ज्यांनी सोन्याच्या या वेगवान वाढीचा फायदा घेतला नाही, त्यांनी आता शांत राहावे. सध्याच्या दरांवर मोठ्या पोझिशन घेऊ नयेत. कारण सोने खूप पुढे निघून गेले आहे आणि कधीही करेक्शन (घसरण) येऊ शकते.
advertisement
जगभरातील कोणत्याही गोल्ड कंपनीचा चार्ट सध्या बुलिश (तेजीचा) नाही. सोने साधारणपणे 5 ते 7 वर्षांत एकदा अशी जोरदार उसळी घेते आणि त्यानंतर काही काळ स्थिर राहते. त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, ज्यांच्याकडे आधीपासून सोने आहे त्यांनी Trailing Stoploss ठेवून पोझिशन सुरू ठेवावी, पण नवीन खरेदी टाळावी.
8th Pay Commissionवरून मोठा गोंधळ, कर्मचारी संतप्त; आयोग नाही, थेट पगारवाढ?
आयटी आणि बँकिंग क्षेत्रात जबरदस्त संधी
लार्ज कॅप आयटी सेक्टर मध्ये सुशील केडिया यांना HCL टेक (HCL Technologies) हा शेअर सर्वाधिक आवडतो. त्यांनी त्याची तुलना “अरबी घोड्याशी” केली आणि सांगितले की, एका वर्षात HCL टेकचा भाव 2400 पर्यंत पोहोचू शकतो.
त्यांच्या मते टेक महिंद्रा (Tech Mahindra) मध्येही पुढे 2800 पर्यंत वाढीची शक्यता आहे. तर टीसीएस (TCS) पुढील 1 ते 2 वर्षांत पुन्हा एकदा नवे विक्रम (New Highs) प्रस्थापित करू शकतो.
बँकिंग क्षेत्राबद्दल बोलताना सुशील केडिया म्हणाले, सर्व बँक शेअर्स सध्या जोरदार रनसाठी तयार आहेत. त्यात विशेषतः IDFC First Bank लक्षात ठेवण्यासारखा आहे. हा ट्रेडिंगसाठी नाही, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य शेअर आहे. एका वर्षात हा शेअर तीनपट होऊ शकतो.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market मध्ये गोल्डन टाइम सुरू, 10 शेअर्सवर ‘परफेक्ट एंट्री पॉइंट’ तयार; पुढील 6 महिन्यात तुमचं रिटर्न डबल