IND vs AUS : रोहित-विराट आठवड्याभरातच भारतात परतणार, गिल आणि संघ नोव्हेंबरपर्यत राहणार, कसं आहे टीम इंडियाचा वेळापत्रक

Last Updated:

रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त आठवडाभरच ऑस्ट्रेलियात थांबणार आहेत.मग शुभमन गिल आणि टीम नोंव्हेबर पर्यंत का थांबणार आहेत?ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचं वेळापत्रक काय आहे?हे जाणून घेऊयात.

ind vs aus rohit sharma
ind vs aus rohit sharma
India vs Australia : येत्या 19 ऑक्टोबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला सूरूवात होणार आहे. या दौऱ्यातील पहिलाच सामना 19 ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात तब्बल 9 महिन्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या दोघांना मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे.त्यामुळे चाहते सुखावणार आहेत. पण या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त आठवडाभरच ऑस्ट्रेलियात थांबणार आहेत.मग शुभमन गिल आणि टीम नोंव्हेबर पर्यंत का थांबणार आहेत?ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचं वेळापत्रक काय आहे?हे जाणून घेऊयात.
खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदा तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे. या मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सूरूवात होणार आहे. पहिला सामना हा पर्थच्या मैदानावर 19 ऑक्टोबरला रंगणार आहे. 23 ऑक्टोबरला दुसरा वनडे सामना हा अॅडलेडच्या मैदानात रंगणार आहे.त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टेस्ट आणि टी20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर ते फक्त आता वनडे क्रिकेटच खेळताना दिसणार आहेत.त्यामुळे हे दोन्ही खेळाडू कदाचित या तीन सामन्यापूरतेच ऑस्ट्रेलियात असतील.त्यानंतर टी20 मालिका सूरू होणार आहे.त्यामुळे दोन्ही खेळाडू भारतात परततील.
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतात परतल्यानंतर शुभमन गिल आणि इतर खेळाडू ऑस्ट्रेलियात राहतील. कारण त्यांच्यातील काही खेळाडूंना टी20 मालिका देखील खेळायचे आहे. या मालिकेला 29 ऑक्टोबरपासून सूरूवात होणार आहे, तर शेवटचा सामना 8 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.त्यामुळे शुभमन गिल आणि टीम नोव्हेंबरपर्यतं ऑस्ट्रेलियात असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
advertisement
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : रोहित-विराट आठवड्याभरातच भारतात परतणार, गिल आणि संघ नोव्हेंबरपर्यत राहणार, कसं आहे टीम इंडियाचा वेळापत्रक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement