IND VS AUS : 19 नोव्हेंबरचा बदला 24 जूनला; कांगारूंना चिरडून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करून विजय मिळवला आहे.
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सोमवार 24 जून रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर 8 चा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करून विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे.
सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर 8 चा सामना रंगला होता. या सामन्यापूर्वी झालेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले होते. टीम इंडियाकडून रोहित शर्माने 92, रिषभ पंतने 15, सूर्यकुमार यादवने 31, शिवम दुबेने 28, हार्दिक पंड्याने 27, रवींद्र जडेजाने 9 धावा केल्या. तर या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला.
advertisement
BUMRAH DISMISSED HEAD.
- Boom is a treasure!! ❤️pic.twitter.com/KqhXUdZGfN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2024
टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 205 धावांची कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपैकी मिचेल स्टार्क आणि मार्श स्टोईनिसने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जॉश हेजलहूडला 1 विकेट घेण्यात यश आले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करताना ट्रेव्हिस हेडने 76, मिचेल मार्शने 37, ग्लेन मॅक्सवेलने 20, टीम डेव्हिडने 15 तर पॅट कमिन्सने 11 धावांची कामगिरी केली. मात्र टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियावर भारी पडले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 7 विकेट्स घेतल्या.
advertisement
अर्शदीप सिंह याने पुन्हा एकदा भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर कुलदीप यादवने 2, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलिया विजयाचं टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरली त्यामुळे टीम इंडियाचा 24 धावांनी पराभव झाला. यासह टीम इंडियाने सुपर 8 मधील 3 सामने जिंकून टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमी फायनलमध्ये धडक दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2024 11:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS AUS : 19 नोव्हेंबरचा बदला 24 जूनला; कांगारूंना चिरडून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये