VIDEO : LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, बांगलादेशच्या कॅप्टनचा आयुषसोबत राडा,मग वैभवने बोट दाखवून वॉर्निंग दिली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बांगलादेशच्या कर्णधाराने आयुश म्हात्रेसोबत शेकहॅड टाळला आहे, तर तिकडे वैभव सुर्यवंशीने बांगलादेशी खेळाडूला बोट दाखवून वॉर्निग दिली आहे. या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
India u19 vs Bangladesh U19 : आयपीएलमधून बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानची हकालपट्टी केल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहे. बांगलादेशने सुरक्षेचे कारण पुढे करून भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा वाद आयसीसी दरबारी आहे. आता या वादाचे पडसाद अंडर 19 वर्ल्डकपमध्ये उमटले आहेत. कारण तिकडे बांगलादेशच्या कर्णधाराने आयुश म्हात्रेसोबत शेकहॅड टाळला आहे, तर तिकडे वैभव सुर्यवंशीने बांगलादेशी खेळाडूला बोट दाखवून वॉर्निग दिली आहे. या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर भारत बांग्लादेश यांच्यातील वादाचा परिणाम अंडर 19 वर्ल्डकपमध्येही पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की टॉस दरम्यान दोन्ही देशाचे कर्णधार मैदानात उपस्थित होते. यावेळी भारताच्या आयुष म्हात्रेंने टॉस उंचावला. हा टॉस बांगलादेशचा कर्णधार अझिझुल हकीमने जिंकल्यानंतर त्याने आयुष म्हात्रेसोबत शेकहॅड करणे टाळले होते.त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता.
Toss news 🗞️#TeamIndia will bat first in their second group game 🆚 Bangladesh!️#ICCMensU19WC | #INDvBAN 👉 LIVE NOW ➡️ https://t.co/DGP23ftABG pic.twitter.com/5hZ9PFHbFL
— Star Sports (@StarSportsIndia) January 17, 2026
advertisement
या राड्यानंतर फलंदाजी आलेल्या वैभव सूर्यवंशीचा जवाद अबरारसोबत राडा झाला. जवाद अबरार आणि वैभव सूर्यवंशीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादा दरम्यान वैभव सूर्यवंशी जवाद अबरारला बोट दाखवून वॉर्निंग देताना दिसला आहे.त्यामुळे या सामन्यात भयंकर राडा झाला होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात चांगली झाली नव्हती. भारताकडून सलामीला उतरलेला आयुश म्हात्रे 6 वर बाद झाला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी शुन्यावर आणि विहान मल्होत्रा 7 वर बाद झाला. भारताचे एकामागून एक विकेट पडत असताना वैभव सूर्यवंशी आणि अभिग्यान कंडूने भारताचा डाव सावरला होता.
advertisement
वैभव सूर्यवंशीन यावेळी 67 बॉलमध्ये 72 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. त्यानंतर हरवांश पंगालिया 2 धावावर बाद झाला. या सामन्यादरम्यात आता पाऊस पडल्याने खेळ थांबला आहे. या दरम्यान अभिग्यान कुंडू 63 तर आर अम्ब्रीश 4 वर खेळतो आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 5:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, बांगलादेशच्या कॅप्टनचा आयुषसोबत राडा,मग वैभवने बोट दाखवून वॉर्निंग दिली










