Bigg Boss Marathi 6 : स्वतःच्या बॉडीचा माज..! ओमकार-विशालच्या मारामारीवर रितेश संतापला, भाऊच्या धक्क्यावर शाळा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का होणार आहे. पहिल्याच धक्क्याला रितेश चांगलाच संतापला.
advertisement
advertisement
advertisement
'भाऊचा धक्का' या विशेष भागात रितेश देशमुखने घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून विशाल आणि ओमकार या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश म्हणाला, "हा शो आता फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतो." अशा वेळी स्पर्धकांनी दाखवलेलं हे वर्तन चुकीचा आदर्श देत असल्याचं रितेशनं ठणकावून सांगितलं.
advertisement
रितेश पुढे म्हणाला, "आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाहीये का? फक्त मारामारी आणि स्वतः:च्या बॉडीचा, ताकदीचा प्रचंड माज आहे ... एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?" अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली.
advertisement
advertisement










