IND vs ENG : इंग्लंड टेस्टआधीच भारताला झटका, स्टार खेळाडूने मैदान सोडलं, गंभीरचं टेन्शन वाढवलं

Last Updated:

टीम इंडिया येत्या 20 जूनपासून 5 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी दोन्ही संघ सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यातही जागा मिळत नसल्याने स्टार खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयाने भारताला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

ind vs eng test
ind vs eng test
India vs England : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया येत्या 20 जूनपासून 5 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी दोन्ही संघ सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यातही जागा मिळत नसल्याने स्टार खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयाने भारताला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडला होता.त्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सराव सामन्यासाठी त्याची इंडिया ए सामन्यात निवड झाली होती. पण ऋतुराज गायकवाडला इंग्लंड विरूद्धच्या दोन्ही सराव सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे वैतागून आता ऋतूराज गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला आहे.ऋतूराज आता काऊंटी क्रिकेटकडे वळला आहे.
advertisement
काउंटी चॅम्पियनशिपच्या उर्वरित सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड यॉर्कशायरमध्ये सामील झाला आहे. इंग्लिश क्लबने मंगळवारी (10 जून)याबाबतची घोषणा केली. या काळात 28 वर्षीय गायकवाड एकदिवसीय कपमध्ये यॉर्कशायरकडून खेळण्याच्या शर्यतीत असेल.पुढील महिन्यात स्कारबोरो येथे सरेविरुद्ध होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यापूर्वी गायकवाड यॉर्कशायर संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
इंग्लंडच्या उर्वरित देशांतर्गत हंगामासाठी मी यॉर्कशायरमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे.या देशात क्रिकेटचा अनुभव घेणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि यॉर्कशायरपेक्षा इंग्लंडमध्ये कोणताही मोठा क्लब नाही.मला माहित आहे की त्यावेळी मी मैदानावर उतरणे किती महत्त्वाचे आहे, जे या हंगामातील सर्वात महत्त्वाचा भाग असेल.काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आमचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत आणि एकदिवसीय कप ही विजेतेपद जिंकण्याची एक उत्तम संधी आहे, असे ऋतुराज गायकवाड म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान गायकवाडने 38 सामन्यांमध्ये 41.77 च्या सरासरीने 2 हजार 632 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी इंडिया अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गायकवाडने खूपच खराब कामगिरी केली.यामध्ये त्याने चार सामन्यांमध्ये फक्त 20 धावा केल्या.2024-25 च्या भारतातील देशांतर्गत हंगामात गायकवाडने 12 डावांमध्ये एका शतकासह 571 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : इंग्लंड टेस्टआधीच भारताला झटका, स्टार खेळाडूने मैदान सोडलं, गंभीरचं टेन्शन वाढवलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement