IND vs NZ 3rd ODI : प्रेक्षकांची स्टेडियममध्ये एन्ट्रीही झाली नाही, तोवर मॅचमध्ये तीन मोठे ड्रामा; इंदौरमध्ये काय घडलं? Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs NZ 3rd ODI, Indore Stadium : न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात पहिल्या 6 मिनिटातच मॅच टीम इंडियाच्या बाजूने झुकली. नेमकं काय घडलं, पाहा
India vs New Zealand 3rd ODI : इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ मॅचेसच्या सीरिजचा शेवटचा आणि निर्णायक सामना रंगत आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने या महत्त्वाच्या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत असल्याने हा सामना दोन्ही संघांसाठी विजेतेपदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशातच पहिल्या सहा मिनिटात मॅच फिरली अन् तीन मोठे ड्रामा पहायला मिळाले.
रविंद्र जडेजाने कॅच सोडला
टीम इंडियाचा बॉलर प्रसिद्ध कृष्णाला आज विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अर्शदीप सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अशातच पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलवर अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सचा कॅच उडवला पण पॉईटला थांबलेल्या रविंद्र जडेजाने कॅच सोडला. तर चौथ्याच बॉलवर अर्शदीपने हेन्री निकोल्सच्या दांड्या उडवल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाने दबदबा मिळवला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील मॅच फिरली.
advertisement
Fabulous start this from #TeamIndia
Arshdeep Singh and Harshit Rana have dismissed both the New Zealand openers
Updates https://t.co/KR2ertVmpx#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fyKf3g0qCO
— BCCI (@BCCI) January 18, 2026
टीम इंडियाला दुसरी विकेट मिळाली
advertisement
अर्शदीपनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये नव्या बॉलने हर्षिदने देखील जादू दाखवली. हर्षितने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेव्हॉन कॉनवेची विकेट काढली. डेव्हॉन कॉनवेने स्लिपला उभ्या असलेल्या रोहितच्या हातात बॉल सोपवला अन् टीम इंडियाला दुसरी विकेट मिळाली. अशाप्रकारे प्रेक्षक मैदानात सेट होत नाहीत तोवर टीम इंडियाने दोन विकेट्स नावावर केल्या.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
advertisement
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 18, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ 3rd ODI : प्रेक्षकांची स्टेडियममध्ये एन्ट्रीही झाली नाही, तोवर मॅचमध्ये तीन मोठे ड्रामा; इंदौरमध्ये काय घडलं? Video







