पुण्यात सोसायटीच्या आवारात सुरू होते जोडप्याचे नको ते चाळे; ज्येष्ठानं हटकलं, रागात तरुणाचं संतापजनक कृत्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरालगतच्या वाघोली परिसरात एका सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला हटकणं एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडलं आहे
पुणे : पुणे शहरालगतच्या वाघोली परिसरात एका सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला हटकणं एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडलं आहे. या कृत्याला विरोध केला म्हणून संबंधित तरुणाने ६६ वर्षीय ज्येष्ठाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील एका नामांकित सोसायटीत राहणारे ६६ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक शुक्रवारी (१६ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोसायटीच्या परिसरातून फिरत होते. त्यावेळी त्यांना सोसायटीच्या आवारात एक तरुण आणि त्याची मैत्रीण अश्लील चाळे करताना दिसले. सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायटीच्या परिसरात असे वागणे चुकीचे असल्याने, ज्येष्ठ नागरिकानी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
"सोसायटीच्या परिसरात असे अश्लील प्रकार करू नका," असे सांगताच आरोपी तरुण संतापला. त्याने ज्येष्ठ नागरिकाचे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. तरुणाने रागाच्या भरात ज्येष्ठाला धक्काबुक्की केली.
advertisement
या घटनेनंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने तातडीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. सोसायटीच्या सुरक्षिततेच्या आणि शिस्तीच्या प्रश्नावरून वाघोली परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 1:48 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात सोसायटीच्या आवारात सुरू होते जोडप्याचे नको ते चाळे; ज्येष्ठानं हटकलं, रागात तरुणाचं संतापजनक कृत्य









