IND vs PAK Rain Prediction : पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला तर? फायनलमध्ये कोण जाणार? पाहा सुपर 4 चं समीकरण

Last Updated:

IND vs PAK Rain Prediction : सुपर फोर स्टेज राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवला जाईल, या राऊंडमध्ये चारही संघ एकमेकांसमोर येतील. चार टीमचे सहा सामने खेळवले जातील.

IND vs PAK Rain Prediction
IND vs PAK Rain Prediction
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप स्टेजचा सामना टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता सुपर फोरमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर असतील. सुपर फोरचा दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रात्री आठच्या सुमारास सामना सुरू होईल. अशातच आता जर पावसाने खोडा (IND vs PAK Rain Prediction) घातला तर आशिया कपच्या फायनलमध्ये कोण जाणार? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. जाणून घ्या सविस्तर

सामना पावसामुळे रद्द झाला तर...

सुपर फोर स्टेज राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवला जाईल, या राऊंडमध्ये चारही संघ एकमेकांसमोर येतील. चार टीमचे सहा सामने खेळवले जातील. या फेरीच्या शेवटी अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्यामुळे स्कोअरिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल नाही, विजयासाठी दोन गुण आणि रद्द झालेल्या सामन्यासाठी एक गुण दिला जातो. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल.
advertisement

पावसाची शक्यता किती?

21 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 32 डिग्री तापमान असण्याची शक्यता आहे. सध्या दुबई आणि अबूधाबी येथे होणाऱ्या या स्पर्धेत पावसाची शक्यता खूप कमी आहे. तसेच हवामान देखील स्वच्छ आहे. अशातच पावसामुळे मॅच रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे. सामन्यादरम्यान 13 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात, अशी माहिती देखील आहे.
advertisement

IND vs PAK पीच रिपोर्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना दुबईमध्ये होणार आहे, जिथे खेळपट्टी त्याच्या संथ वर्तनासाठी ओळखली जाते. दुबईच्या मैदानावर वेगवान आउटफिल्ड आहे. तथापि, मैदानाच्या मोठ्या आकारामुळे फिरकीपटूंना फोर मारणं कठीण होते. मागील सामन्यांमध्ये ड्यू हा मोठा चिंतेचा विषय नव्हता, परंतु तरीही कर्णधारांना त्यावर लक्ष ठेवावं लागेल. या पीचवर प्रथम फलंदाजी करणं फायदेशीर ठरू शकतें.
advertisement
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा संघ - सलमान अली आगा (कॅप्टन), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रॉफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफियान मोकीम.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK Rain Prediction : पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला तर? फायनलमध्ये कोण जाणार? पाहा सुपर 4 चं समीकरण
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement