Suryakumar Yadav : ट्रॉफी न घेणं सुर्यकुमारला भोवणार? विजेता संघानं कप घ्यायलाच नकार दिला, तर त्या Trophy काय होतं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अखेरीस मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊनच मैदानाबाहेर गेले. त्यानंतर टीम इंडियाने खोटी ट्रॉफी उचलल्याचं सेलिब्रेशन केलं, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं.
मुंबई : भारताने पाकिस्तानवर दणदणीत मात करत एशिया कपचं विजेतेपद 9व्यांदा पटकावलं. हा विजय जसा ऐतिहासिक होता, तसाच तो वादग्रस्तही ठरला. कारण सामना संपल्यानंतर मैदानावर ट्रॉफी वितरणावेळी असा प्रसंग घडला, ज्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रीडाविश्वात नवा प्रश्न उभा राहिला, जर विजेता संघ ट्रॉफी घ्यायलाच नकार देतो, तर त्या ट्रॉफीचं काय होतं?
फायनलनंतर एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे चेअरमन आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांना ट्रॉफी घेण्यासाठी बोलावलं मात्र, सूर्यकुमारने ते स्वीकारण्यास नकार दिला. संपूर्ण टीम इंडिया जिंकल्यानंतर मैदानात होती पण सगळे खाली बसले होते आणि आराम करत होते. पण कोणीही ट्रॉफी घ्यायला गेलं नाही.
काही वेळ वातावरण तंग राहिलं आणि अखेरीस मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊनच मैदानाबाहेर गेले. त्यानंतर टीम इंडियाने खोटी ट्रॉफी उचलल्याचं सेलिब्रेशन केलं, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं.
advertisement
या घटनेनंतर चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली, जर ट्रॉफी घेण्यात आली नाही, तर ती कुणाकडे राहते?
क्रिकेटच्या अधिकृत नियमांनुसार, विजेता संघच ट्रॉफीचा खरा हकदार असतो. कोणत्याही कारणास्तव जर संघाने ट्रॉफी स्वीकारली नाही, तरीही ती अधिकृतरीत्या त्याच संघाचीच राहते. ती रनर-अप संघाला दिली जाऊ शकत नाही. टूर्नामेंटचे आयोजकच त्या ट्रॉफीची देखभाल करतात आणि नंतर योग्य वेळी ती विजेत्यांना सुपूर्द करतात.
advertisement
दंडाची शक्यता आहे का?
ICC च्या नियमांमध्ये असं स्पष्ट लिहिलं नाही की ट्रॉफी न स्वीकारणाऱ्या संघावर थेट कारवाई होईल. कारण हे वर्तन स्पिरिट ऑफ द गेम म्हणजेच क्रीडासंहितेच्या विरोधात मानलं जाऊ शकतं.
जर एखाद्या कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, तर त्याला आपल्या निर्णयाचं कारण आयोजकांना सांगावं लागतं. त्यानंतर ACC आणि ICC मिळून या प्रकरणाची चौकशी करू शकतात. जर आचारसंहितेचं उल्लंघन झालं असं आढळलं, तर कर्णधारावर कारवाई केली जाऊ शकते.
advertisement
आता या प्रकरणात बीसीसीआय आपला अहवाल ICC कडे देणार आहे. त्यानंतर ICC आपल्या नियमांनुसार चौकशी करून अंतिम निर्णय घेईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 9:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : ट्रॉफी न घेणं सुर्यकुमारला भोवणार? विजेता संघानं कप घ्यायलाच नकार दिला, तर त्या Trophy काय होतं?