IND vs PAK : मॅचमध्ये दोन टर्निंग पाईंट पण सलमानने पाकिस्तानच्या या खेळाडूला ठरवलं विलन, कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK Salman Agha : आम्हाला माहितीये की, आमची आशिया कपमध्ये चांगली कामगिरी झाली नाही, असं सलमान अली आगा म्हणाला आहे.
Salman Agha Press Conference : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया कपच्या फायनलनंतर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा याने स्वत:च्या खेळाडूंना पराभवाचं खापर फोडलं. टीम इंडियाने क्रिकेटचा अपमान केला आहे, असं सलमान प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला. त्यावेळी त्याने मॅच कुठं पलटली? यावर खुलासा केला. त्यावेळी त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना विलन ठरवलं.
नेमकं काय म्हणाला सलमान अली आगा?
आम्ही दोन्ही इनिंगची सुरूवात केली. पण अखेरीस आमच्या हातातून मॅच गेली. कुणा एका खेळाडूमुळे आम्ही हारत नाही तर आम्ही एक टीम म्हणून हारलो. हॅरिस रौफ आमच्यासाठी खास बॉलर आहे. आज त्याच्याकडून चांगली बॉलिंग झाली नाही, पण प्रत्येकासाठी खराब दिवस असतो, असं सलमान अली आगा म्हणाला. आम्हाला माहितीये की, आमची आशिया कपमध्ये चांगली कामगिरी झाली नाही, असं सलमान अली आगा म्हणाला.
advertisement
आमच्यासाठी हा टर्निंग पाईंट...
आम्ही अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केली पण काही लूप होल होते. आम्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आज चांगली कामगिरी केली. पण दोन्ही वेळी आम्ही फिनिशिंग चांगली केली नाही. दोन्ही वेळी आमच्याकडे संधी होती पण आम्हाला ते जमलं नाही, त्यामुळे मला वाटतं की, आमच्यासाठी हा टर्निंग पाईंट होता, असं सलमान अली आगा म्हणाला.
advertisement
हॅरिसला का बॉलिंग दिली?
अबरार आणि सॅम चांगली बॉलिंग करत असताना हॅरिसला का बॉलिंग दिली? असा सवाल सलमानला विचारला गेला. त्यावेळी त्याने आपली प्लॅनिंग सांगितली. हॅरिसने मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली म्हणून त्याला बॉलिंग दिली पण त्याला मार पडला, असं म्हणत त्याने हॅरिसवर खापर फोडलं आहे. त्यावेळी त्याला बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना मिस केलं का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने दोघांशिवाय आमची टीम चांगली कामगिरी करतीये, असं उत्तर दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मॅचमध्ये दोन टर्निंग पाईंट पण सलमानने पाकिस्तानच्या या खेळाडूला ठरवलं विलन, कुणावर फोडलं पराभवाचं खापर?