IND vs PAK सामन्यात काहीतरी मोठं घडणार? पाकिस्तानच्या ट्रेनिंग सेशनमध्ये दिसला 'तो'व्यक्ती, कोण आहे?

Last Updated:

आशिया कपच्या सुपर कप 4 मध्ये आज भारत-पाकिस्तान भिडणार आहे. या सामन्याला काही वेळातच सूरूवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना सामन्याची उत्सुकता लागली आहे. या दरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे.

ind vs pak super 4 match
ind vs pak super 4 match
Asia Cup 2025, Super 4 India Vs Pakistan : आशिया कपच्या सुपर कप 4 मध्ये आज भारत-पाकिस्तान भिडणार आहे. या सामन्याला काही वेळातच सूरूवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना सामन्याची उत्सुकता लागली आहे. या दरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे.पाकिस्तानच्या ट्रेनिंग सेशनमध्ये एक व्यक्ती दिसला आहे. हा व्यक्ती पाकिस्तानी खेळाडूंसोबत स्पॉट झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेऊयात.
रेव्हस्पोर्टसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ शनिवारी मैदानात सराव करत असताना एका व्यक्तीची एंन्ट्री झाली होती.हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसीन नक्वी होता. मोहसीन नक्वी यांनी शनिवारी अचानक ट्रेनिंग सेशन दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली होती. यासोबत कोच माईक हेसन सोबत देखील त्यांनी काही काळ चर्चा केली.त्यामुळे नक्वी यांच्या या एंन्ट्रीने पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी शिजत असल्याचा वास येतोय.
advertisement

पाकिस्तानी खेळाडूंना स्पष्ट मेसेज

मोहसीन नक्वी यांनी यावेळी पाकिस्तानी खेळाड़ूंना प्रोत्साहित केले आहे.त्याचसोबत काही करून भारताला हरवा. जीव तोडून खेळा असा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला भारताला हरवून एक मोठा राजकीय संदेश यानिमित्ताने द्यायचा आहे, असे सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे हायव्होल्टेज सामन्यात काहीतरी मोठं घडणार आहे. इतकं मात्र नक्की.
advertisement

हॅन्डशेकचा वाद पेटणार

खरं तर साखळी फेरीतील सामन्यात पंच अँडी पायक्राफ्टच्या आदेशानंतर टॉस दरम्यान भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाला हॅन्डशेक करण्याचे टाळण्यास सांगितले होते. त्यानंतर सामना जिंकल्यानंतर देखील भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक टाळला होता. खरं तर पाकिस्तान खेळाडू वाट पाहत होते, पण भारतीय संघाने थेट ड्रेसिंग रूम गाठली होती.त्यामुळे पाकिस्तान रागाने लालबुंद झाला होता.
advertisement
भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान संघाने खूप आकाडतांडव केला होता. पाकिस्तानने पंच अँडी पायक्राफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळून लावत मोठा धक्का दिला होता. यासोबत भारताने नियमाचा भंग केल्याचा आरोप करत कारवाईचीही मागणी केली होती.पण अद्याप तरी भारतावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे.
advertisement
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा संघ : सलमान अली आगा (कॅप्टन), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रॉफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफियान मोकीम.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यात काहीतरी मोठं घडणार? पाकिस्तानच्या ट्रेनिंग सेशनमध्ये दिसला 'तो'व्यक्ती, कोण आहे?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement