IND vs SA : 9 ओव्हर टाकल्या तरी विकेट नाही, गिल प्रचंड भडकला,शेवटी एका ओव्हरच्या विनवणी नंतर 'मियाँमॅजिक' दिसलं

Last Updated:

मोहम्मद सिराजला 9 ओव्हर टाकून विकेटच मिळत नव्हते. त्यामुळे कॅप्टन गिलने ओव्हरच द्यायचे टाळले होते.शेवटी सिराजला त्याच्याकडे ओव्हरसाठी विनवणी करावी लागली,

ind vs sa 1st test
ind vs sa 1st test
India vs South Africa 1st Test : भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या पहिल्या टेस्ट सामन्याचा पहिला दिवस खूप रोमांचक होता. या सामन्यात अनेक घडामोडी घडल्या.जसप्रीत बुमराहाच तो व्हिडिओ काय व्हायरल झाला.त्याचसोबत आता मोहम्मद सिराजची एक घटना समोर आली आहे. यामध्ये मोहम्मद सिराजला 9 ओव्हर टाकून विकेटच मिळत नव्हते. त्यामुळे कॅप्टन गिलने ओव्हरच द्यायचे टाळले होते.शेवटी सिराजला त्याच्याकडे ओव्हरसाठी विनवणी करावी लागली, त्यानंतर त्याला ओव्हर देण्याल आली आणि त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या होत्या.
खरं तर सामन्याच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने 6 ओव्हर टाकल्या होत्या. या ओव्हरमथ्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.त्यामुळे शुभमन गिल प्रचंड नाराज झाला होता.त्यानंतर त्याने मोहम्मद सिराजला ओव्हर देणे टाळले होते. साधारण खूप वेळ त्याने सिराजला ओव्हरच दिली नव्हती. त्यामुळे तो देखील निराश झाला होता. पण नंतर त्याने शुभमन गिलकडे विनंती केली. मला एक ओव्हर दे त्यानंतर त्याला ओव्हर मिळाली.
advertisement
दरम्यान ओव्हर मिळाल्यानंतर देखील तो संघर्षच करत होता. कारण त्याला पुढच्या तीन ओव्हर विकेट मिळाली नाही. पण नंतर त्याने 10 व्या ओव्हरला 2 विकेट काढल्या होत्या. सिराजने 45 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. सिराजने वेरीनेला एलबीडब्ल्यू तर मार्को जॅनसनला शुन्यावर बाद केले होते.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या होत्या.
advertisement
सामना संपल्यानंतर काय म्हणाला?
पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला की,नवीन चेंडू बॅटवर चांगला येत होता, पण जेव्हा चेंडू मऊ झाला तेव्हा उसळीही कमी झाली. माझी मानसिकता पूर्ण आणि स्टंपवर गोलंदाजी करण्याची होती. काही रिव्हर्स स्विंग ऑफरमध्ये होते, जर तुम्ही स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट घेण्याचे पर्याय मिळतील आणि फलंदाजांना धावा करणे सोपे नाही. एका टोकाला फलंदाजी करणे चांगले असते, तर दुसऱ्या टोकाला - उसळी बदलते आणि धावा करणे कठीण असते,असे सिराज म्हणाला.
advertisement
पुढे सिराजने बुमराहने दिलेल्या सल्ल्याची माहिती दिली. जस्सी भाईंनी मला सांगितले की विकेट घ्यायचा असेल तर तुला स्टंम्पवर बॉल टाकावा लागेल, असे केलंस तर तुला एलबीडब्ल्यूवर विकेट मिळेल किंवा कॅचेस जातील असे त्याने सांगितले.त्यामुळे त्याचा सल्ला मानल्यानंतर सिराजने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 9 ओव्हर टाकल्या तरी विकेट नाही, गिल प्रचंड भडकला,शेवटी एका ओव्हरच्या विनवणी नंतर 'मियाँमॅजिक' दिसलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement