IND vs SA : विराट मैदानाबाहेर जाताच चमत्कार, टीम इंडियाच्या 'फ्लाईंग जट'कडे मार्करमही बघत राहिला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या रायपूर वनडेमध्ये तिलक वर्माने केलेल्या फिल्डिंगमुळे चाहत्यांना जॉन्टी ऱ्होड्स आठवला आहे.
रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या रायपूर वनडेमध्ये तिलक वर्माने केलेल्या फिल्डिंगमुळे चाहत्यांना जॉन्टी ऱ्होड्स आठवला आहे. विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये गेल्यामुळे तिलक वर्मा फिल्डिंगसाठी मैदानात आला होता, तेव्हा त्याने बाऊंड्री लाईनवर 5 रन वाचवले. 20 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला कुलदीप यादवच्या बॉलिंगवर मार्करमने मोठा शॉट खेळला. बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाईल असं वाटत होतं, पण तिलक वर्माने उंच झेप घेऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण आपण बाऊंड्री लाईनबाहेर असल्याचं समजताच तिलकने बॉल बाहेर फेकला. तिलकच्या या फिल्डिंगमुळे टीम इंडियाने 5 रन वाचवल्या. हे करण्यासाठी तिलक वर्माला एका सेकंदापेक्षाही कमी वेळ मिळाला.
तिलक वर्माच्या या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कामगिरीबद्दल चाहते तिलकचं कौतुकही करत आहेत. उत्कृष्ट फिल्डिंग केल्यानंतर तिलक वर्मा पुन्हा एकदा ड्रेसिंग रूममध्ये गेला.
Tilak Varma ಅವರಿಂದ ಎಂತಹ ಅದ್ಭುತ ಪ್ರಯತ್ನ!
ಇವರ ಈ ಅಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಯತ್ನದಿಂದಾಗಿ ತಂಡಕ್ಕೆ ರನ್ಗಳು ಉಳಿದವು!
ವೀಕ್ಷಿಸಿ | #INDvSA 1st T20I | 9th DEC, 6 PM | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TeamIndia pic.twitter.com/UW3c50eYo8
— Star Sports Kannada (@StarSportsKan) December 3, 2025
advertisement
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा याने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिले बॅटिंगला पाठवलं. यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 358 रन केले. ऋतुराज गायकवाडने 105 तर विराट कोहलीने 102 रनची खेळी केली. याशिवाय कर्णधार केएल राहुलने 66 रनचं मोलाचं योगदान दिलं. 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला दुसरी वनडे जिंकणं गरजेचं आहे.
view commentsLocation :
Raipur,Chhattisgarh
First Published :
December 03, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : विराट मैदानाबाहेर जाताच चमत्कार, टीम इंडियाच्या 'फ्लाईंग जट'कडे मार्करमही बघत राहिला, Video


