IND vs SA : 148 वर्ष, 2 हजार 609 मॅच, कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडले, तुम्हाला तरी माहिती आहे का?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
क्रिकेटच्या 148 वर्षात आणि 2 हजार 609 सामन्यात जे कधीच घडलं नव्हतं ते आजच्या सामन्यात घडलं आहे.त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं आहे? जाणून घेऊयात.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडीयमध्ये आज भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यात क्रिकेटच्या 148 वर्षात आणि 2 हजार 609 सामन्यात जे कधीच घडलं नव्हतं ते आजच्या सामन्यात घडलं आहे.त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं आहे? जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. साऊथ आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि रॅन रिकल्टनने साऊथ आफ्रिकेच्या डावाची सूरूवात केली होती. दोन्ही खेळाडूंनी आफ्रिकेच्या डावाची चांगली सुरूवात केली होती. एडन मार्करम 38 धावांवर जसप्रीत बुमराहच्या बॉलवर क्लिन बोल्ड झाला होता.तर रॅन रिकल्टन 35 धावांवर कुलदीप यादवच्या बॉलवर विकेटमागे कॅचआऊट झाला होता.
advertisement
सलामीवीर बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा फलंदाजीसाठी मैदानात आले होते. यावेळी दोन्ही खेळाडूंनी मैदानात टीचून फलंदाजी केली होती. यावेळी टेम्बा बावुमा आपलं अर्धशतक ठोकेल असे वाटत असताना रविंद्र जडेजाने त्याला जाळ्यात फासले आणि टेम्बा यशस्वीच्या हातात कॅच देऊन बसला. विशेष म्हणजे ही कॅच खूप कठीण होती पण जयस्वालने पुढे डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतली.त्याच्या पाठोपाठ ट्रिस्टन स्टब्सही चांगला लयीत खेळत होता. तो आपलं अर्धशतक ठोकेल असे वाटत असताना कुलदीप यादवने त्याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुलकडे कॅच देऊन आऊट केले. अशाप्रकारे ट्रिस्टन स्टब्स 49 धावांवर बाद झाला.ज्यामुळे त्याचे अर्धशतक हुकलं.
advertisement
त्यानंतर टोनी डे झोर्झी आणि विआन मुल्डर मैदानात आला होता. यावेळी कुलदीप यादवने पुन्हा फिरकीची जादू दाखवत विआन मुल्डरला आऊट केले.मुल्डर 25 धावांवर बाद झाला.त्यानंतर सामन्याच्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टोनीला सिराजला विकेटमागे कॅच आऊट केले. अशाप्रकारे टोनी 28 वर बाद झाला.सध्या दिवस अखेर सेनुरन मुथुस्वामी 25 वर कायल वेरेने 1 वर नाबाद खेळतो आहे. आणि साऊथ आफ्रिकेने दिवसअखेर 6 विकेट गमावून 247 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
भारताकडून कुलदीप यादवने 3 विकेट तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. पहिल्या दिवशी पहिले दोन सेशनवर साऊथ आफ्रिकेच्या नावावर राहिले तर शेवटच्या सेशनमध्ये भारताने 4 विकेट गमावून सामन्यात वापसी केली आहे.
advertisement
आता या सामन्यात इतिहास काय घडला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच,तर त्याचं झालं असं की साऊथ आफ्रिकेच्या सूरूवातीच्या चारही बॅटसमनही 35 हून अधिक धावा ठोकल्या, पण धावांचा हा पल्ला ओलांडून देखील त्यांना अर्धशतक ठोकता आलं नाही. त्यामुळे पहिला टेस्ट सामना 1877 साली खेळला होता, तेव्हापासून ते आता 2025 या 148 वर्षात असे कधीच घडले नव्हते. ते आज या सामन्यात घडले आहे. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडली नसलेली घटना आज घडली आहे.
advertisement
गुवाहाटी कसोटीसाठी भारताचा संघ: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, साई सुदर्शन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
गुवाहाटी कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी, केशव महाराज
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 4:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 148 वर्ष, 2 हजार 609 मॅच, कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडले, तुम्हाला तरी माहिती आहे का?


