IND vs SA : पृथ्वीबाबांची आई प्रमिलाकाकींचा महिला क्रिकेटसाठी पुढाकार, इंदिरा गांधींना विनंती, संघटनेच्या स्थापनेची खास गोष्ट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
तुम्हाला माहिती आहे का? वुमेन्स क्रिकेटचा पाया कुणी रचला?त्या व्यक्तीचं नेमकं नाव काय होतं? त्याने वुमेन्स क्रिकेटसाठी कशाप्रकारे योगदान दिलं? हे जाणून घेऊयात.
India vs South Africa Final : तीनच दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्याच रविवारी टीम इंडियाच्या महिला संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर देशभर जल्लोष करण्यात आला. आजही हा जल्लोष सूरू आहे आणि विजयाची चर्चा सूरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? वुमेन्स क्रिकेटचा पाया कुणी रचला?त्या व्यक्तीचं नेमकं नाव काय होतं? त्याने वुमेन्स क्रिकेटसाठी कशाप्रकारे योगदान दिलं? हे जाणून घेऊयात.
खरं तर टीम इंडियाच्या ज्या महिला संघाचा वर्ल्ड कप विजय आपण साजरा करत आहोत. त्या विजयाचे संपूर्ण श्रेय एका महिलेला जाते. कारण जर 1970 साली जर महिलेने आवाज उचलला नसता आणि पंतप्रधानांकडे स्वतंत्र क्रिकेट असोसिएशनची मागणी केली नसती तर कदाचित आजच चित्र आपल्याला पाहायला मिळालं नसतं. त्यामुळे त्या महिला आधी कोण आहेत त्या पाहूयात.
advertisement
काँग्रेसच्या दिवंगत नेत्या माजी खासदार प्रेमलाबाई चव्हाण असे त्यांचे नाव आहे. त्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री आहेत. 1970 चा दशक होता, त्यावेळेस पुरुषांचे क्रिकेट आधीच सुरू झाले होते. पुरुषांच्या क्रिकेटसाठी असणारी सगळी संसाधने होती.पण मग महिला क्रिकेटसाठी पुढे कोण येणार? असा मोठा प्रश्न होता. तेव्हा महाराष्ट्रातील कराडच्या या जिद्दी महिलेने वुमेन्स क्रिकेट सुरू करण्याचा विडा उचलला.
advertisement
महिलांनी जागतिक स्तरावर खेळावं हे प्रेमलाबाई चव्हाण यांचं स्वप्न होतं. पण भारतात महिला क्रिकेटसाठी वेगळे असोसिएशन नव्हतं. अशावेळी प्रेमलाबाई थेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे गेल्या. त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यांनी देखील या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर 1973 मध्ये प्रेमलाबाई यांनी वुमेन्स क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली.अशाप्रकारे भारतीय महिला क्रिकेटपटूला एक अधिकृत व्यासपीठ मिळालं.
advertisement
आता असोसिएशन स्थापन झाल्यानंतर भारतीय महिला संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1976 खेळू शकला. हे भारतीच नारीच्या स्वातंत्र्याच आणि समानतेच पहिलं पाऊल होतं.त्यानंतर खऱ्या अर्थाने महिला क्रिकेटला सूरूवात झाली आणि आजतागायत सूरू देखील आहे.त्यामुळे आज महिला क्रिकेटला जे जागतिक व्यासपीठ मिळालं त्याचे खरं श्रेय जाते प्रेमलाबाई चव्हाण यांना जाते.
भारताने जरी आज वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याकाळी जर प्रेमलताबाई यांनी जर वुमेन्स क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय़ घेतला नसता तर आजचा हा दिवस आपल्याला पाहता आला नसता.त्यामुळे महिला क्रिकेटमागे खऱ्या अर्थाने योगदान प्रेमलाबाई चव्हाण यांचेच आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 9:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : पृथ्वीबाबांची आई प्रमिलाकाकींचा महिला क्रिकेटसाठी पुढाकार, इंदिरा गांधींना विनंती, संघटनेच्या स्थापनेची खास गोष्ट


