IND vs SA फायनल डीवाय पाटीलला, पण तिकीट कशी मिळणार? वाचा किंमत आणि बुकींगची संपूर्ण स्टेप्स
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघातील फायनल सामन्याची तिकीट कशी मिळणार आहे? बुकींगची एकंदरीत प्रक्रिया काय आहे? आणि तिकटाची एकूण किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.
India vs South Africa Final Ticket : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात उद्या 2 नोव्हेंबर 2025 ला आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर रंगणार आहे.त्यामुळे या फायनल सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी मुंबईससह इतर राज्यातील नागरीकांची धडपड सूरू आहे.त्यामुळे सामन्याची तिकीट कशी मिळणार आहे? बुकींगची एकंदरीत प्रक्रिया काय आहे? आणि तिकटाची एकूण किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर भारताचा महिला संघ याआधी 2005 आणि 2017 पर्यंत फायनल पर्यंत पोहोचला होता.पण त्यांना फायनल सामना जिंकता आला नव्हता. आता तब्बल 8 वर्षानंतर पुन्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासाठी चाहते तिकीट बुकींग करण्याचे मागे लागले आहेत.
फायनलची तिकीट बुकींग कशी करालं?
वुमेन्स वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचं तिकीट चाहत्यांना बुक माय शो (Book My Show) वरून खरेदी करता येतील.(विक्री अद्याप लाइव्ह झालेली नाही, परंतु तिकिटे आज, 1 नोव्हेंबर रोजी कधीही खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील).
advertisement
Book My Show च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर जा.
वरच्या बारमधून क्रीडा पर्याय निवडा किंवा शोधा.
IND विरुद्ध SA महिला विश्वचषक अंतिम सामना पर्याय निवडा.
जागेची उपलब्धता तपासा आणि तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या तिकिटांची संख्या निवडा.
तिकीट श्रेणी निवडा (म्हणजे, सामान्य किंवा प्रीमियम सीट) आसन योजना आणि तिकिटाची किंमत तपासा.
advertisement
पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
तुमच्या स्मार्टफोनवर ई-तिकीट मिळवा.
फायनल सामन्याच्या तिकिटांची किंमत किती?
तिकिटांची विक्री अद्याप थेट सुरू नसल्याने अंतिम सामन्याच्या तिकिटांची वास्तविक किंमत अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु लीग टप्प्यातील तिकिटांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे जिथे सामान्य स्टँडसाठी त्यांची किंमत 100 रुपयांपर्यंत कमी होती. सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांनी असा दावा केला आहे की तिकिटांच्या किमती जवळजवळ 1000 टक्केवाढू शकतात, ज्यामध्ये व्हीआयपी स्टँडची किंमत तब्बल 1.7 लाख आहे. हे फक्त अनुमान आहेत आणि विक्री थेट सुरू झाल्यावरच अधिकृत पुष्टीकरण करता येईल.
advertisement
तिकीट विक्रीवरून मोठा वाद
view commentsखरं तर चाहते फायनलच्या सामन्याचं तिकीट बुक करायला गेला असता सूरूवातीला बुक माय शो साईटवर कमिंग सुन असा पर्यात दाखवत होता. पण आता थेट तिकीट सोल्ड आऊट झाल्याचे दाखवत आहे.त्यामुळे चाहते प्रचंड रागावले आहेत आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA फायनल डीवाय पाटीलला, पण तिकीट कशी मिळणार? वाचा किंमत आणि बुकींगची संपूर्ण स्टेप्स


