IND vs SA : 'ज्यांनी स्वत:च्या कारकिर्दीत काहीच...', टीम इंडियाचा दिग्गज गंभीर-आगरकरवर भडकला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या ऑस्ट्रेलिआ दौऱ्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्यावरून प्रचंड चर्चा सूरू आहे. दोघं चांगल्या लयीत असले तर त्यांना संघात जागा मिळेल असे बोलले जात होते.
Harbhajan Singh on Gautam Gambhir Ajit Agarkar : भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे सामना हा 6 डिसेंबर 2025 ला विषाखापट्टणच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाना मालिका खिशात घालण्याची संधी आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर प्रचंड टीका होतेय.या दरम्यान आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने आता गौतम गंभीर आणि अजित आगरकरला सुनावलं आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिआ दौऱ्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्यावरून प्रचंड चर्चा सूरू आहे. दोघं चांगल्या लयीत असले तर त्यांना संघात जागा मिळेल असे बोलले जात होते. या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही खेळाडूंनी यशस्वीरित्या पार केला. आता साऊथ आफ्रिकेचा दौराही दोघेही यशस्वीपणे पार पडताना दिसत आहे. या दरम्यान टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंहने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
हरभजन सिंह म्हणाला आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबतचे निर्णय तेच घेत आहेत ज्यांनी स्वतः त्यांच्या कारकिर्दीत फारसे काही साध्य केलेले नाही.विशेष म्हणजे यात हरभजनने थेट अजित आगरकरला लक्ष्य केले आहे.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल आणि एकदिवसीय संघात त्यांच्या सततच्या उपस्थितीबद्दल सुरू असलेल्या वादावर हरभजन सिंगने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने ते निराशाजनक म्हटले आहे, "विराट कोहली अजूनही चांगला खेळत आहे हे पाहून मला आनंद झाला. ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काहीही साध्य केलेले नाही ते त्यांचे भविष्य ठरवत आहेत हे निराशाजनक आहे,अशा शब्दात हरभजनने गंभीर आगरकरवर टीका केली आहे.
advertisement
हरभजन सिंगने पुढे त्याच्यासोबत घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण केली. तो म्हणाला, "मी स्वतः एक खेळाडू आहे. मी स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत हे घडताना पाहिले आहे. हे खूप निराशाजनक आहे. आम्ही याबद्दल बोलत नाही किंवा चर्चा करत नाही. त्या दोघांनीही (रोहित आणि विराट) धावा केल्या आहेत आणि नेहमीच भारतासाठी उत्तम खेळाडू राहिले आहेत. त्यांच्या कामगिरीवरून हे सिद्ध होते की पुढील विश्वचषकात त्यांच्या सहभागाबद्दल कोणतीही शंका नाही, असाही विश्वास हरभजनने व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'ज्यांनी स्वत:च्या कारकिर्दीत काहीच...', टीम इंडियाचा दिग्गज गंभीर-आगरकरवर भडकला


