बॅचलर मुलाच्या घरात रात्री 2 महिला राहिल्या; सकाळी दार ठोठावत आले सोसायटीवाले अन् जे केलं ते धक्कादायक
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Single Tenants: बेंगळुरूमध्ये एका बॅचलर रहिवाशाला मोठा धक्का बसला, जेव्हा दोन महिला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये रात्री राहिल्या म्हणून सोसायटीने थेट 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. या मनमानी नियमामुळे सोशल मीडियावर संताप उसळला असून बॅचलर्सवरील भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बेंगळुरू: एका तरुणाने सोशल मीडियावर (Reddit) एक धक्कादायक घटना शेअर केली. त्याने सांगितले की त्याच्यासह फ्लॅटमेटवर त्यांच्या हाउसिंग सोसायटीने 5,000 रुपयांचा दंड लावला. कारण दोन महिला त्यांच्या भाड्याच्या घरात रात्रभर राहायला आल्या होत्या. त्याने या दंडाची इनव्हॉइसची स्क्रिनशॉट पोस्ट करत विचारलं की सोसायटीविरोधात कोणती कायदेशीर कारवाई करता येईल का?
advertisement
सोसायटीचा नियम असा आहे की बॅचलर्सना रात्री पाहुणे ठेवण्याची परवानगी नाही; पण कुटुंबांसाठी कोणतेही बंधन नाही. तरुणाच्या म्हणण्यानुसार मेंटेनन्सचे पैसे, सुविधा आणि सर्वच नियम सर्वांसाठी सारखे असतानाही केवळ अविवाहित असल्यामुळे हा भेदभाव केला गेला. त्याला या आधी कधीही अशा कोणत्याही नियमभंगाबद्दल इशारा किंवा माहिती देण्यात आलेली नव्हती आणि पहिल्याच प्रसंगी थेट दंड लावला गेला. त्यामुळे तो या नियमाविरुद्ध काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत का याबाबत विचारत आहे.
advertisement
या घटनेवर Reddit वर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हा दंड कायद्याने अमान्य असल्याचे सांगितले. काहींनी असेही म्हटले की, हे लागूच करवता येणार नाही आणि वेळ व पैसा असेल तर कोर्टात खेचता येईल. पण प्रत्यक्षात घरमालक त्रास देऊ लागेल म्हणून ते अवघड आहे.
advertisement
एका युझरने म्हटले की हा नियम सोसायटीने स्वतःला जणू "OYO हॉटेल" समजण्यासारखा आहे. इतर अनेकांनी बॅचलर्सविषयी भारतीय शहरांमध्ये असलेल्या जुनाट मानसिकतेकडे लक्ष वेधले आणि सांगितले की अशा प्रकारचे भेदभाव करणारे नियम अनेक वर्षांपासून चालत आले आहेत.
advertisement
काहींनी या व्हिजिटर मॅनेजमेंट अँप्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण ते रहिवाशांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप करतात. त्यांचे म्हणणे होते की रहिवाशांनी कोणाला घरी आणावे, कोण किती वेळ राहावे हे वैयक्तिक जीवनाशी संबंधित निर्णय आहेत आणि सोसायटीकडे त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. आणखी एका कमेंटमध्ये म्हटले होते की, हा प्रकार म्हणजे तरुणांचा शोषण करण्याचा नवीन मार्ग आहे.
advertisement
एकूणच या घटनेने पुन्हा सिद्ध केले की अनेक सोसायट्यांमधील नियम आजही मनमानी, भेदभावपूर्ण आणि कायदेशीर आधार नसलेले असतात. बॅचलर्सना भेडसावणारी वागणूक, गोपनीयतेवरील गदा आणि सोसायटींचे वाढते नियंत्रण या सगळ्यामुळे अनेक रहिवाशांमध्ये नाराजी पसरताना दिसते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:39 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बॅचलर मुलाच्या घरात रात्री 2 महिला राहिल्या; सकाळी दार ठोठावत आले सोसायटीवाले अन् जे केलं ते धक्कादायक


