IND vs SA : दोघं मुंबईचे तर एक जण पुण्याचा... वनडेमध्ये ओपन कोण करणार? आगरकरच्या निर्णयाने नवा कॅप्टन हैराण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे भारतीय टीमचे कर्णधार आणि उपकर्णधार अजूनही फिट झालेले नाहीत.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे भारतीय टीमचे कर्णधार आणि उपकर्णधार अजूनही फिट झालेले नाहीत, त्यामुळे त्यांची वनडे टीममध्ये निवड झालेली नाही. गिल आणि अय्यर अनफिट असल्यामुळे केएल राहुलला भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर जसप्रीत बुमराहला वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
ओपनिंगला कोण खेळणार?
शुभमन गिल फिट नसल्यामुळे ऋतुराज गायकवाडचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका ए सीरिजविरुद्ध ऋतुराजने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं होतं, ज्यामुळे टीम इंडियाचा सीरिजमध्ये विजय झाला. ऋतुराजचं टीममध्ये कमबॅक झालं तरी त्याला ओपनिंगला बॅटिंगची संधी मिळणार का? याबाबत मात्र शंका आहे.
ओपनिंगला रोहित शर्मा बॅटिंग करणार हे निश्चित आहे, आता रोहितसोबत यशस्वी जयस्वाल बॅटिंगला येणार का ऋतुराज गायकवाड याचा निर्णय कर्णधार केएल राहुल आणि कोच गौतम गंभीरला घ्यावा लागणार आहे. यशस्वी जयस्वाल हा डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशन साधण्यासाठी रोहितसोबत यशस्वी जयस्वाल ओपनिंगला यायची शक्यता आहे, तर विराट कोहली तिसऱ्या त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल. या परिस्थितीमध्ये ऋतुराजला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी दिली जाऊ शकते.
advertisement
वनडे सीरिजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेट कीपर), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर, रायपूर
advertisement
तिसरी वनडे - 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : दोघं मुंबईचे तर एक जण पुण्याचा... वनडेमध्ये ओपन कोण करणार? आगरकरच्या निर्णयाने नवा कॅप्टन हैराण!


