IND vs SA : पालथ्या घड्यावर पाणी! टॉस जिंकून साऊथ अफ्रिकेने थेट कॅप्टन बदलला पण केएलने चूक सुधारली नाही, पाहा प्लेइंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs South Africa 2nd odi : साऊथ अफ्रिकेने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टेम्बा बावुमा टीममध्ये पुन्हा आलाय.
IND vs SA 2nd odi playing xi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रायपूर येथे खेळला जाणार आहे. शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारताने रायपूरमध्ये कधीही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया विजयी घोडदौड सुरू ठेवणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच साऊथ अफ्रिकेने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टेम्बा बावुमा साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन म्हणून संघात परत आलाय.
वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा संधी
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग चांगली झाली पण बॉलिंगमध्ये बॉलर्सने खूर मार खाल्ला. खासकरून स्पिनर्सला चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता प्लेइंग इलेव्हनमध्ये एक्ट्रा बॉलर आणण्याची शक्यता होती. वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर नितीश कुमार रेड्डी खेळेल, असं वाटत असताना केएल राहुलने पुन्हा गौतम गंभीरच्या फेवरेटला संधी दिली आहे.
advertisement
Here's a look at our Playing XI for the nd #INDvSA ODI #TeamIndia have named an unchanged side.
Updates https://t.co/oBs0Ns6SqR@IDFCFIRSTBank pic.twitter.com/B4CQac3rE6
— BCCI (@BCCI) December 3, 2025
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
आतापर्यंत रायपूरमध्ये फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. जानेवारी 2023 मध्ये भारताने न्यूझीलंडला 8 विकेट्सने हरवले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 59 एकदिवसीय सामने समोरासमोर खेळले गेले आहेत. भारताने 28 जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने 30 एकदिवसीय सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांनी भारतात 25 सामने खेळले, ज्यामध्ये टीम इंडियाने 15 जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने 10 सामने जिंकले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : पालथ्या घड्यावर पाणी! टॉस जिंकून साऊथ अफ्रिकेने थेट कॅप्टन बदलला पण केएलने चूक सुधारली नाही, पाहा प्लेइंग इलेव्हन


