IND vs SA Final : फायनलपर्यंत लपवून ठेवला गोल्डन आर्म, हरमनने शेवटच्या क्षणी बाहेर काढला,12 बॉलमध्येच गेम ओव्हर केला!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करून टीम इंडियाने 7 विकेट गमावून 298 रन केले. भारताकडून ओपनर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यात 104 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली.

फायनलपर्यंत लपवून ठेवला गोल्डन आर्म, हरमनने शेवटच्या क्षणी बाहेर काढला,12 बॉलमध्येच गेम ओव्हर केला!
फायनलपर्यंत लपवून ठेवला गोल्डन आर्म, हरमनने शेवटच्या क्षणी बाहेर काढला,12 बॉलमध्येच गेम ओव्हर केला!
नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करून टीम इंडियाने 7 विकेट गमावून 298 रन केले. भारताकडून ओपनर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यात 104 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. शफालीने सर्वाधिक 87 रन केले तर दीप्ती शर्माने 58 बॉलमध्ये 58 रनची खेळी केली. स्मृती मंधानानेही 45 रनची महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मलाबा, नदिने डे क्लार्क आणि च्लोई ट्रायनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
भारताने दिलेल्या 299 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरूवात केली. कर्णधार लॉरा वोलव्हार्टड आणि तझिम ब्रिट्स यांच्यात 51 रनची पार्टनरशीप झाली, पण अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने ही पार्टनरशीप तुटली. यानंतर श्री चारिणीने एनाके बॉशला शून्य रनवर माघारी धाडलं. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर वोलव्हार्टडने सुन लुसच्या मदतीने इनिंग सावरायला सुरूवात केली.
advertisement

शफाली वर्माचा गोल्डन आर्म

टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत वाटत असताना शफाली वर्माने भारताला लागोपाठ दोन विकेट मिळवून दिल्या. 21 व्या आणि 23 व्या ओव्हरमध्ये शफालीने 1-1 विकेट काढली. सून लुसला शफालीने तिच्याच बॉलिंगवर 25 रनवर आऊट केलं, त्यानंतर तिने धोकादायक मरिझेन कॅप्पलाही 4 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आधी सर्वाधिक 87 रनची खेळी केल्यानंतर शफालीने बॉलिंगमध्येही तिची जादू दाखवली.
advertisement

सेमी फायनलला टीममध्ये आली

शफाली वर्मा वर्ल्ड कपच्या भारतीय टीमचा भाग नव्हती, पण प्रतिका रावलला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली, त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या क्षणी बदल करावे लागले आणि शफाली वर्माची टीम इंडियात एन्ट्री झाली. निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने शेवटच्या क्षणी दाखवलेला हा विश्वास शफालीने फायनलमध्ये सार्थ ठरवला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : फायनलपर्यंत लपवून ठेवला गोल्डन आर्म, हरमनने शेवटच्या क्षणी बाहेर काढला,12 बॉलमध्येच गेम ओव्हर केला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement