आशिया कप Sony वर झाला, भारत-वेस्ट इंडिज सीरिज कुठे दिसेल? Live मॅच पाहण्यासाठी आताच Install करून घ्या App

Last Updated:

Ind vs WI आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, यानंतर आता भारतीय खेळाडू पुढच्या चॅलेंजसाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.

आशिया कप Sony वर झाला, भारत-वेस्ट इंडिज सीरिज कुठे दिसेल? Live मॅच पाहण्यासाठी आताच Install करून घ्या App
आशिया कप Sony वर झाला, भारत-वेस्ट इंडिज सीरिज कुठे दिसेल? Live मॅच पाहण्यासाठी आताच Install करून घ्या App
मुंबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, यानंतर आता भारतीय खेळाडू पुढच्या चॅलेंजसाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर सीरिजची दुसरी टेस्ट 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल. हे दोन्ही सामने सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारी ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 च्या सत्राचा भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या विजयाच्या शोधात असलेली वेस्ट इंडिज सहाव्या क्रमांकावर आहे.

भारत-वेस्ट इंडिजचं हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 100 टेस्ट मॅच झाल्या आहेत, यातल्या 30 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा तर 23 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आणि 47 सामने ड्रॉ झाले. या सीरिजमध्ये टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार असेल. याआधी झालेल्या इंग्लंड सीरिजमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली होती.
advertisement

भारतीय टीम

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन (विकेट कीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव

वेस्ट इंडिजची टीम

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलोन अंडरसन, एलिक अथेन्स, जॉन कॅम्पबेल, टेगनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रीव्हस, शाय होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रॅन्डन किंग, अंडरसन फिलीप, खेरी पीयर, जेडेन सील्स
advertisement

कुणे पाहता येणार सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचची सीरिज स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दिसणार आहे, तर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर पाहता येईल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कप Sony वर झाला, भारत-वेस्ट इंडिज सीरिज कुठे दिसेल? Live मॅच पाहण्यासाठी आताच Install करून घ्या App
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement