IND vs PAK Final : मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंमुळे गंभीरला फायनलआधी टेन्शन, एक चूक अन् आशिया कप हातातून निसटणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Asia Cup 2025, IND vs PAK Final : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवच फॉर्ममध्ये नसल्याने टीम इंडियासाठी ही सर्वात मोठी चिंतेचा विषय आहे.
INDIA vs PAKISTAN Final : आशिया कपचा फायनल (Asia Cup 2025 Final) सामना 41 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने आशिया कपच्या आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं पारडं जड झालं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान रडत रडत फायनलमध्ये पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी एक चूक पराभवाचं कारण ठरू शकते. त्यामुळे फायनलआधी हेड कोच गौतम गंभीरला मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) दोन खेळाडूंनी टेन्शन दिलं आहे.
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म
टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाहीयेत. मुख्यत: टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवच फॉर्ममध्ये नसल्याने टीम इंडियासाठी ही सर्वात मोठी चिंतेचा विषय आहे. सूर्याला यंदाच्या आशिया कपमध्य़े चांगली कामगिरी करता आली नाही. सूर्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली अन् संयमाने सामना जिंकवून दिला होता. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या मॅचवेळी देखील सूर्या शुन्यावर बाद झाला. त्यामुळे सूर्याच्या फॉर्मवरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
advertisement
पांड्या बॅटिंग विसरलाय की काय?
तर दुसरीकडे टीम इंडियाचा फिनिशर मानल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याला देखील नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्या कुल बनण्याच्या नादात बॅटिंग विसरलाय की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. हार्दिक पांड्याला यंदाच्या आशिया कपमध्ये रन्स करता आल्या नाहीत. पण पांड्याने काही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या आहेत. पण बॉलिंगमध्ये पांड्याचा चोप देखील तितकाच पडला आहे. त्यामुळे आता पांड्याचा फॉर्म देखील टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
advertisement
अभिषेक शर्मा एकटा बास
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा एकटाच पाकिस्तानला भारी पडू शकतो. तर शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियाला मोठा दिलासा आहे. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी आपली जादू दाखवली असून शिवम दुबे देखील आपल्या ऑलराऊड कामगिरी प्रभावित करत आहे. तर बुमराहची कामगिरी यंदाच्या सामन्यात चर्चेचा विषय असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 10:06 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK Final : मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंमुळे गंभीरला फायनलआधी टेन्शन, एक चूक अन् आशिया कप हातातून निसटणार!