IND vs SA : कोलकातानंतर गुवाहाटीमध्ये गर्जना, तो आला अन् दोन ओव्हरमध्ये पलटला गेम, तासाभरात गुंडाळले टीम इंडियाचे 'कागदी शेर'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs South Africa Guwahati Test : टेम्बा बावुमाने आपली कोलकातावरील विजयाचा हुकमी एक्का काढला. सायमन हार्मर याने बॉलिंगला सुरूवात केली अन् टीम इंडियाचे खेळाडू कोलमडू लागले.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या या महत्त्वाच्या लढतीत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून, सामन्याचे पारडे पूर्णपणे पाहुण्या संघाच्या बाजूने झुकले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय गोलंदाजांना प्रतिस्पर्धी फलंदाजांनी चांगलेच सतावल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीला भारताचे वर्चस्व असेल असे वाटत असतानाच, लोवर ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे यजमान टीम बॅकफूटवर फेकली गेली होती. अशातच आता साऊथ अफ्रिकन बॉलर्सचा कहर पहायला मिळत आहे.
टेम्बाने हुकमी एक्का काढला
13 धावांवरून टीम इंडियाचा खेळ तिसऱ्या दिवशी सुरू झाला. त्यावेळी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिला एक तास साऊथ अफ्रिकेला झुंजवलं. मात्र, टेम्बा बावुमाने आपली कोलकातावरील विजयाचा हुकमी एक्का काढला. सायमन हार्मर याने बॉलिंगला सुरूवात केली अन् टीम इंडियाचे खेळाडू कोलमडू लागले. सायमन हार्मर याने यशस्वी जयस्वाल अन् त्यापाठोपाठ साई सुदर्शनला बाद केलं. त्यामुळे टीम इंडिया लगेच कोलमडल्याचं पहायला मिळालं.
advertisement
साई सुदर्शन अन् जयस्वाल आऊट
यशस्वी जयस्वाल 97 बॉलमध्ये 58 धावा करून आऊट झाला तर साई सुदर्शन हा 40 बॉलमध्ये 15 धावा करून आऊट झालाय. सायमन हार्मर याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज याला देखील केएल राहुलची मोठी विकेट मिळाली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
दरम्यान, आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामीने जबरदस्त संयम दाखवत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि 107 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला मार्को जान्सेनने आक्रमक साथ दिली. जान्सेनने भारतीय गोलंदाजीची पिसं काढत 93 धावा कुटल्या, ज्यामध्ये तब्बल 7 सिक्स समाविष्ट होते. या जोडीने आणि तळाच्या फलंदाजांनी मिळून शेवटच्या चार विकेट्ससाठी 243 धावा जोडल्या, ज्यामुळे या मॅचचे चित्रच पालटले. भारताच्या गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या, पण इतर फिरकी गोलंदाजांची जादू चालली नाही. जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स मिळवल्या, मात्र दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : कोलकातानंतर गुवाहाटीमध्ये गर्जना, तो आला अन् दोन ओव्हरमध्ये पलटला गेम, तासाभरात गुंडाळले टीम इंडियाचे 'कागदी शेर'


