IPL 2025 : खरंच दुखापत का CSK ने बाहेर केलं? ऋतुराज पत्नीसह हनुमान गढीवर, Video च्या कमेंटनी सस्पेन्स वाढला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. मोसमातली पहिली मॅच जिंकल्यानंतर सीएसकेने लागोपाठ पाच मॅच गमावल्या आहेत.
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. मोसमातली पहिली मॅच जिंकल्यानंतर सीएसकेने लागोपाठ पाच मॅच गमावल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही सीएसके शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. एकीकडे खराब कामगिरी सुरू असतानाच सीएसकेला पहिल्या पाच सामन्यांनंतर मोठा धक्का बसला. कोपर फ्रॅक्चर झाल्यामुळे सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर झाला.
ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर एमएस धोनीकडे सीएसकेचं नेतृत्व पुन्हा एकदा देण्यात आलं, पण सीएसकेच्या या निर्णयावर चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ऋतुराजला खरंच दुखापत झाली का त्याला टीममधून बाहेर केलं? अशा शंका चाहत्यांकडून उपस्थित केल्या जात आहेत. नुकताच ऋतुराज गायकवाड त्याच्या पत्नीसोबत हनुमान गढीवर हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता.
advertisement
Ruturaj Gaikwad and CSK players visited Hanuman Garhi Temple. ❤️pic.twitter.com/E2ByY5Fxk4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2025
ऋतुराज गायकवाडचा हनुमान गढीचं दर्शन घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये चाहत्यांनी त्याला खरंच दुखापत झाली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधीही ऋतुराज गायकवाडचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यावरूनही चाहत्यांनी ऋतुराजला खरंच दुखापत झाली आहे का? अशा कमेंट केल्या होत्या.
advertisement
दुखापतीच्या दोन मॅचनंतर ऋतुराज बाहेर
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा बॉल ऋतुराजच्या कोपराला लागला, यानंतर तो दिल्ली आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळला, पण केकेआरविरुद्धच्या मॅचआधी ऋतुराजच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. कोपराला फ्रॅक्चर झाल्याचं दोन सामन्यांनंतर कसं समोर आलं? फ्रॅक्चर असतानाही ऋतुराज दोन मॅच कसा खेळला? अशा वेगवेगळ्या शंका तेव्हाही चाहत्यांनी उपस्थित केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 13, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : खरंच दुखापत का CSK ने बाहेर केलं? ऋतुराज पत्नीसह हनुमान गढीवर, Video च्या कमेंटनी सस्पेन्स वाढला!