Mumbai Indians: सलग 4 सामने हरणारी मुंबई प्लेऑफमध्ये कशी पोहोचली? वाचा 5 कारणे

Last Updated:

मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये देखील जागा बनवली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारी मुंबई चौथी टीम ठरली आहे.दरम्यान सलग 4 सामन्यात पराभव झेलणारी मुंबई इडियन्स प्लेऑफपर्यंत कशी पोहोचली? हे जाणून घेऊयात.

mumbai indians ipl 2025 story
mumbai indians ipl 2025 story
Mumbai Indians, Play off Scenario : वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 121 धावांवर ऑलआऊट केले आहे. त्यामुळे मुंबईने हा सामना 58 धावांनी जिंकला आहे.या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये देखील जागा बनवली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारी मुंबई चौथी टीम ठरली आहे.दरम्यान सलग 4 सामन्यात पराभव झेलणारी मुंबई इडियन्स प्लेऑफपर्यंत कशी पोहोचली? हे जाणून घेऊयात.
खरं तर मुंबई इंडियन्स हंगामाची पहिली मॅच हारतेच हारते,कारण तसं शास्त्र असतं. कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध त्यांना हा सामना गमावावा लागला होता.या सामन्यानंतर मुंबई पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र गुजरात विरूद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिसरी मॅच मुंबईने कशी बशी कोलकत्ता विरूद्ध जिंकली.
त्यानंतर लखनऊ सूपर जाएंटस आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु विरूद्ध पुन्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.त्यामुळे मुंबईने सलग चार सामने गमावले आहे. मुंबईची अशी सुरूवात पाहून ती टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल असे कुणाला स्वप्नात देखील वाटले नसले. पण हार्दिकच्या नेतृत्वात संघाने ते करून दाखवलं आहे.
advertisement
मुंबईचे फलंदाज मोठी खेळी करण्यास अपयशी ठरते होते. गोलंदाजांना देथील मोठे यश येत नव्हते.याच कारणामुळे मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागत होते.
चार सामने गमावल्यानंतर मुंबई अगदी पॉईट्स टेबलमध्ये तळाशी गेला होता.त्यानंतर 13 एप्रिलला दिल्ली विरूद्ध सामना जिंकला. या सामन्यापासून खऱ्या अर्थाने मुंबईच्या संघात विजयी स्पिरिट दिसला.इथून मग मुंबईने पराभवाचे तोंडही पाहिल नाही.
advertisement
दिल्लीला हरवल्यानंतर हैदराबादला धुळ चारली. त्यानंतर चेन्नईकडून पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर पुन्हा हैदराबाद, लखनऊ आणि राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं.गुजरात विरूद्ध मुंबईला सामना जिंकायची संधी होती. पण डीएलएस मेथडमुळे मुंबईने हातचा सामना गमावला.त्यानंतर आज दिल्लीला धुळ चारून आज मुंबईने प्लेऑफमध्ये चौथे स्थान गाठले.
पराभवानंतर रोहित शर्मा देखील लयीत आला होता. रोहितने चेन्नईविरूद्ध अर्धशतक ठोकलं होतं.त्यामुळे रोहित लयीत आल्यामुळे इतर खेळाडूंची बॅटींगही चालली.
advertisement
बुमराह वगळता इतर खेळाडूंना गोलंदाजी फारशी चांगली कामगिरी करता येत नव्हती.मात्र शेवटी दीपक चहरही लयीत आला.तसेच मुंबईच्या काही युवा खेळाडूंनी कमालिची गोलंदाजी केली होती. याचा फायदा त्यांना झाला.
दरम्यान आता मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचली आहे पण आता आयपीएलची फायनल मारणार का? हे आता काही दिवसात कळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians: सलग 4 सामने हरणारी मुंबई प्लेऑफमध्ये कशी पोहोचली? वाचा 5 कारणे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement