IPL 2025 : मॅचआधी जीवे मारण्याची धमकी, काव्याचा स्टार खेळाडू टीममधून बाहेर, हैदराबादला धक्का

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होत आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर हैदराबादचा स्टार खेळाडू या सामन्यातून बाहेर झाला आहे.

मॅचआधी जीवे मारण्याची धमकी, काव्याचा स्टार खेळाडू टीममधून बाहेर, हैदराबादला धक्का
मॅचआधी जीवे मारण्याची धमकी, काव्याचा स्टार खेळाडू टीममधून बाहेर, हैदराबादला धक्का
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होत आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर हैदराबादचा स्टार खेळाडू या सामन्यातून बाहेर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेलवरून ही धमकी देण्यात आली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि टीममध्ये तीन बदल केल्याचं सांगितलं ज्यात मोहम्मद शमीचं नावही होतं.
हैदराबादने शमीशिवाय ऑलराऊंडर नितीशकुमार रेड्डी आणि कामिंदू मेंडिस यांनाही टीमबाहेर केलं. या तिघांऐवजी सचिन बेबी, अभिनव मनोहर आणि एहसान मलिंगा यांना संधी देण्यात आली आहे. सचिन बेबी आणि अभिनव मनोहर अनकॅप भारतीय खेढालू आहेत, तर मलिंगा श्रीलंकेचा फास्ट बॉलर आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर ट्रॅव्हिस हेड याला इम्पॅक्ट सब म्हणून वापरण्यात येणार आहे.
advertisement

शमी टीमबाहेर

या सामन्याआधी मोहम्मद शमीला मेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद शमीची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंतच्या 9 सामन्यांमध्ये शमीला फक्त 6 विकेट घेता आल्या, तर 4 सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने शमीला टीमबाहेर करण्याचा निर्णय घेतला.

हैदराबादची प्लेयिंग इलेव्हन

advertisement
अभिषेक शर्मा, ईशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, झीशान अन्सारी, ईशान मलिंगा, जयदेव उनाडकट

दिल्ली कॅपिटल्सची प्लेयिंग इलेव्हन

अभिषेक पोरेल, फाफ डुप्लेसिस, करुण नयार, केएल राहुल, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, विप्रज नीगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी. नटराजन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : मॅचआधी जीवे मारण्याची धमकी, काव्याचा स्टार खेळाडू टीममधून बाहेर, हैदराबादला धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement