IPL 2026 Auction : एका मॅचमध्ये 19 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड, शाहरुखला मिळाला 'सिक्सर किंग', रहाणेचा ओपनिंग पार्टनर कोण?

Last Updated:

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू आयपीएल 2026 मध्ये अजिंक्य रहाणेसोबत ओपनिंगला खेळेल.

एका मॅचमध्ये 19 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड, शाहरुखला मिळाला 'सिक्सर किंग', रहाणेचा ओपनिंग पार्टनर कोण?
एका मॅचमध्ये 19 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड, शाहरुखला मिळाला 'सिक्सर किंग', रहाणेचा ओपनिंग पार्टनर कोण?
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला नवा ओपनिंग पार्टनर मिळाला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू आयपीएल 2026 मध्ये अजिंक्य रहाणेसोबत ओपनिंगला खेळेल. लिलावाच्या आधी केकेआरने दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर बॅटर क्विंटन डिकॉकला रिलीज केलं होतं, त्यामुळे त्यांना विकेट कीपर आणि ओपनिंग बॅटरची गरज होती. केकेआरने लिलावामध्ये न्यूझीलंडचा विकेट कीपर आणि ओपनर फिन ऍलन याला विकत घेतलं. केकेआरने फिन ऍलनसाठी 2 कोटी रुपये मोजले, जी त्याची बेस प्राईज होती.

कोण आहे फिन ऍलन

न्यूझीलंडचा विकेट कीपर बॅटर असलेला फिन एलन हा आक्रमक ओपनर आहे. जून महिन्यात मेजर क्रिकेट लीगच्या मॅचमध्ये फिन ऍलनने तब्बल 19 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. या सामन्यात फिन ऍलनने 51 बॉलमध्ये 151 रनची वादळी खेळी केली होती. याच इनिंगसोबत फिन ऍलनने क्रिस गेलचं टी-20 इनिंगमध्ये 18 सिक्सचा विक्रम मोडला होता. फिन ऍलनने 52 टी-20 सामन्यांमध्ये 25.2 ची सरासरी आणि 163.28 च्या स्ट्राईक रेटने 1285 रन केले आहेत, यामध्ये 5 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे.
advertisement

पाकिस्तानलाही धुतलं

याआधी 2024 साली फिन ऍलनने न्यूझीलंडकडून खेळताना 62 बॉलमध्ये 137 रन ठोकले होते. या इनिंगमध्ये त्याने 16 सिक्स मारल्या होत्या. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर होता. याच सामन्यात फिन ऍलनने हारिस राऊफला 14 बॉलमध्ये 6 सिक्स मारल्या होत्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका बॉलरला 6 सिक्स मारल्याची ही तिसरी वेळ होती, त्याआधी युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला, कायरन पोलार्डने अकिला धनंजयाला आणि जॉश इंग्लिसने रवी बिष्णोईला 6 सिक्स मारल्या होत्या.
advertisement

केकेआरच्या टीममध्ये कोण?

फिन ऍलनच्या आधी केकेआरने यंदाच्या मोसमातली विक्रमी बोली लावली. ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी रुपयांना विकत घेतलं, याचसोबत ग्रीन हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. तर मथिशा पथिराणाला केकेआरने 18 कोटी रुपयांना विकत घेतलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : एका मॅचमध्ये 19 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड, शाहरुखला मिळाला 'सिक्सर किंग', रहाणेचा ओपनिंग पार्टनर कोण?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement